वृत्तसंस्था
बीड : बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पशुधनाची हानी झाली. सुमारे २९ जनावर दगावली आहेत. २० ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. 6 killed, livestock damaged in Beed district : The houses also collapsed
बीड जिल्ह्यात ४ सप्टेंबरपासून अतिवृष्टी झाली आहे. यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णच उद्ध्वस्त झाला आहे. मोठ्या धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांचे नुकसान झाले. वडवणी तालुक्यात बंधाऱ्यात वाहून जाऊन ३ जणांचा मृत्यू झाला तर अंगावर भिंत पडून बीड आणि गेवराई मध्ये तालुक्यात दोन महिलांचा मृत्यू झाला.
जनावरे, कोंबड्याही वाहून गेल्या
बीड शहराजवळच्या कपिलधार येथे वाहत्या पाण्यात पुरुषाचा मृत्यू झाला आहे. बीडमधील केज तालुक्यात पुरात तीन बैल वाहून गेले असून धारूरमध्ये एक, आष्टीमध्ये सहा शेळ्या, दोन बैल, दोन वासरू, एक म्हैस पुरात वाहून गेली आहे. पाटोदा तालुक्यात एक वगार वाहून गेले, गेवराई तालुक्यात एक गाय तीन बैल वाहून गेले. १२०० कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या तर शिरूर कासार तालुक्यात एक शेळी आणि ५० कोंबड्या वाहून गेल्या असून बीड तालुक्यात पाच शेळ्या सुद्धा वाहून गेल्या आहेत.
नांदेडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला
नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.अनेक भागात पूरसदृश्य परस्थिती असून अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हजारो हेक्टर शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
गोदावरी, आसना, मन्याड, तापी या प्रमुख नद्यासह ओढे व नाल्यांना मोठा पूर आला. अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत आहे. परिणामी मुखेड येथे मोती नाल्या वरून कारसह ४ जण पुरात वाहून गेले आहेत. एकाला ग्रामस्थांनी वाचविले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App