विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते नगरसेवक धीरज घाटे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी विकी क्षीरसागर, मनोज पाटाेळे आणि महेश आगलावे यांना अटक केली आहे. ते मनसेचे कार्यकर्ते आहेत. Conspiracy to attack BJP corporator Dheeraj Ghate, three MNS activist arrested
धिरज घाटे हे भाजपचे नगरसेवक असून आंबिलओढा परिसरातून ते निवडून आले आहेत. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे पूर्वी त्यांचेच कार्यकर्ते होते. ५ वर्षांपासून त्यांनी बरोबर काम करणे सोडले. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर मनसेचा कार्यकर्ता असून तो आगामी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. विकी क्षीरसागर हा घाटे यांच्या कार्यकर्त्यांना आपल्यासोबत काम करावे यासाठी वेगवेगळे प्रलोभने दाखवित असे.
घाटे हे ३ सप्टेंबर रोजी दुपारी चहा पिण्यासाठी शास्त्री रस्त्यावरील सफ्रॉन हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधील एसी रुममध्ये तिघे जण येऊन त्यांच्याकडे पहात होते. घाटे यांना संशय आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले अमर आवळे हे हॉटेलबाहेर गेले. तेथे विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे थांबले असल्याचे त्यांनी घाटे यांना सांगितले.
जवळपास अर्धा तास तिघे जण त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून होते. त्यानंतर ६ सप्टेंबरला ते पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेले असताना त्या ठिकाणी असणारे संशयित हॉटेल बाहेर थांबलेला विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याशी निगडीत होते. त्यानंतर घाटे हे हॉटेलच्या बाजूला असलेल्या ज्ञानल मंगल कार्यालयात गेले. तेथे संशयित व्यक्तीबाबत चौकशी केल्यावर त्यांना कार्यालयातील स्टाफने हटकले होते. त्यावेळी त्यांनी हल्ल्याची माहिती घेण्यास आले असे सांगितले. त्यानंतर घाटे यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही पाहिले. तेव्हा त्यांना खात्री झाली की तेव्हा ते हल्ल्याच्या तयारीने आले होते.
महापालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणूकीत राकेश क्षीरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचून त्यांच्यावर हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App