वृत्तसंस्था
पुणे : लॉकडाऊन लावून सरकारचं बरं चाललं आहे. मोर्चे, आंदोलने नाहीत, कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, बरं चाललंय सरकारचं, अशा शब्दात महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला फटकारले.Does corona spread during Dahihandi, Ganeshotsav ?; Raj Thackeray’s question to the state government
सरकारलाच आता निवडणुका नको आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत.
या महिन्यातील राज ठाकरे यांचा पुण्याचा हा आठवा दौरा आहे. राज यांनी येथील ८ विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते
सरकारला निवडणूक नको आहे
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित ठेवण्यावर सर्व पक्षांचं एकमत झालं आहे. त्यावर तुमचं मत काय?, त्यावर ते म्हणाले, निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजेत. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे.
सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहे कारण नंतर सरकारच पालिकेवर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार आहे.
हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
सर्व करण्याची फक्त मानसिकता हवी
सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणले तर इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली.
सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असे ते म्हणाले.
लसीकरणानंतरच शाळा उघडाव्यात
केवळ तिसऱ्या चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही केला. तरच शाळा सुरु करण्याबाबत ते म्हणाले, मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असेही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App