विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाचे कारण देत गर्दी होईल म्हणून दहीहंडी, गणेशोत्सवाला महाविकास आघाडीचे सरकार परवानगी देत नाही. मात्र, त्यांचेच मंत्री स्वागतासाठीही गर्दी करू लागले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीतील राष्ट्र्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी झालेल्या गर्दीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, त्यामुळे नेटकºयांनी आव्हाड यांच्यावर चांगलीच टीका केली असून लोका सांगे ब्रम्हज्ञान…असे म्हटले आहे.Jitendra Awhad made a video of the crowd for the welcome
महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रीच आता कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत.
आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसत आहे. मोटारसायकलीवरून कार्यकर्ते जात असल्याचं दिसत आहे.
दहीहंडीला परवानगी द्या म्हणलो तर कोरोनाचं कारण देणार. गणपती उत्सवाला परवानगी नाकारली. मंदिरं उघडायला परवानगी नाही. उद्धव ठाकरे व अजित पवार १०-१५ सामान्य माणसं रस्त्यावर दिसली की लॉकडाऊनची धमकी देतात. आणि तुम्हाला तुमचा रुबाब झाडण्यासाठी गर्दी करतांना लाज नाही वाटत?’, अशा शब्दात एका नेटकºयाने संताप व्यक्त केला आहे.
तुमच्या स्वागतात… इतक्या गर्दीत कोरोना येत नसेल, तर मग मंदिरात, हिंदू सणांना, गणपती-दहीहंडीलाच कोरोना डोकं वर काढतोय का साहेब? का तुम्हीच आमच्या हिंदू सणांना डोकं वर काढू देत नाहीत. जरातरी आदर्श लोखप्रतिनिधीसारखं वागा, असे एका तरुणाने म्हटले आहे.
काय साहेब, तुमच्या पक्षाचे नेते अजित पवार लोकांना लोकांना मोठ्या टिंब्या मारून सांगतात मास्क लावा, गर्दी करू नका आणि तुम्ही असं वागतात. सण आला तर फक्त तुम्हाला कोरोना आठवतो का? बाकीच्या वेळी कोरोना नसतो का?’, असा सवालही केला जात आहे.
‘जितेंद्र आव्हाड साहेब, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या सरकारला सर्वसामान्य जनतेला सांगायचं गर्दी करू नका. कोरोना वाढत आहे. तिसरी लाट येणार आहे. मात्र नेतेमंडळी, मंत्रिमंडळ बिनधास्त रस्त्यावर गर्दी करत मोर्चे काढतात. त्यामुळे कोरोना कुठे जातो? सर्वसामान्य जनतेसाठी फक्त निर्बंध आहेत का? अशा शब्दांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App