विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे तर पाकिस्तानचा स्लिपर सेल असल्याची टीका मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी कॉँग्रेसने एका समितीचे गठण केले आहे.Digvijay Singh is Pakistan’s Slipper Cell, Madhya Pradesh Minister Vishwas Sarang’s criticism
त्याचे अध्यक्षपद दिग्विजय सिंह यांच्याकडे दिले आहे. सारंग म्हणाले . दिग्विजय सिंह यांना सरकारविरोधातील रणनीती बनवण्यासाठीच्या समितीचे अध्यक्षपद देणे ही गंभीर गंभीर बाब आहे. ते तर पाकिस्तानचा स्लिपर सेल म्हणनू काम करत आहेत.
एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी), राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन धोरण यासह विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचे कॉँग्रेसने ठरविले आहे. त्यासाठी आंदोलनाच्या समितीचे अध्यक्षपद दिग्विजय सिंह यांच्याकडे देण्यात आले आहे.
प्रियांका गांधी वाड्रा, उत्तम कुमार रेड्डी, मनीष चतरथ, बी के हरिप्रसाद, रिपुन बोरा, उदित राज, रागिनी नायक आणि जुबेर खान यांना समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App