विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने महिला सरपंचाला खाली पाडून तिचा विनयभंग करीत मारहाण करण्यात केली. शुक्रवारी सकाळी लसीकरण केंद्रावर दोन तरुणांमध्ये झालेला वाद सोडविण्यासाठी त्या गेल्या होत्या या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यामध्ये विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Woman Sarpanch beaten up and molested by NCP worker
सुजित सुभाष काळभोर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित काळभोर हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एका लसीकरण केंद्रावर गेला होता. या ठिकाणी त्याचा अविनाश उर्फ पप्पू बडदे याच्यासोबत वाद झाला. त्यावेळी काळभोर यांनी बडदे यांच्या कानाखाली मारली.
सरपंच या नात्याने या महिला सरपंच त्यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी गेल्या. त्यावेळी काळभोर याने त्यांना देखील शिवीगाळ करीत त्यांच्या कानाखाली मारली. तसेच त्यांच्या डाव्या हाताला धरुन जमीनीवर खाली पाडले. तसेच या महिलेची साडी ओढली. यावेळी त्याने संबंधित महिला सरपंचाला अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास एका महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App