प्रतिनिधी
गपूर – विधानसभा निवडणूकीत कमी जागा असताना मुख्यमंत्रीपदासाठी भाजपशी युती तोडून काँग्रेस – राष्ट्रवादीशी पाट लावणाऱ्या शिवसेनेच्या पोपटाचा प्राण मुंबईतल्या सत्तेमध्ये आहे. तिथे त्यांना हरवा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज नागपूरातून केले.Defeat backstabber shivsena in mumbai election, says chandrakant patil in nagpur
विदर्भ दौऱ्यात माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या घरी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चंद्रकांतदादांना भेटले. त्यावेळी त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरी आवाहन केले.
सत्तेसाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे, असे ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून आपल्या विदर्भ दौऱ्यातील संवादाची माहिती दिली आहे.
चंद्रकांतदादांनी ट्विट केली आहेत, की ओबीसीचा मुद्दा हा फार सोपा आहे. मुळात सरकारला ओबीसी असो, मराठा असो किंवा इतर असो, कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. मराठा समाज मागास आहे, हे पुन्हा मांडायचे असेल, तर राज्य सरकार त्याची सुरुवात का करत नाही ? सुप्रीम कोर्टाचा निकाल लागूनही यांनी ६ महिने वाया घालवले आहेत.
विदर्भ दौऱ्यात माझे सहकारी, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या घरी जाण्याचा योग आला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उत्साहाने भेटीला आले होते. या सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. असे संवाद नेहमीच उत्साह वाढवणारे असतात. pic.twitter.com/uuzHEq8HOt — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) September 3, 2021
विदर्भ दौऱ्यात माझे सहकारी, माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या घरी जाण्याचा योग आला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उत्साहाने भेटीला आले होते. या सगळ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. असे संवाद नेहमीच उत्साह वाढवणारे असतात. pic.twitter.com/uuzHEq8HOt
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) September 3, 2021
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या नावाखाली सर्व लोकोपयोगी योजना बंद करून ठेवल्या आहेत आणि आपली तिजोरी भरण्यासाठी बाकीचे धंदे सुरु ठेवले आहेत. या सरकारच्या राज्यात कोणतीही विमा कंपनी महाराष्ट्रात विम्याचे टेंडर भरण्यासाठी तयार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
मोदी सरकारने सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी लोकांना लाभ मिळाला असून आता औषधी वनस्पतींची शेती करण्यासाठीही सरकारने पुढाकार घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमिताने देशभरातील ७५ हजार हेक्टर जमिनीवर औषधी वनस्पतींची शेती केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची आत्मनिर्भरतेच्या दिशेने यशस्वी आणि अविरत वाटचाल सुरू आहे. कोरोना महामारी पूर्वीच्या तुलनेत निर्यात क्षेत्रात ८.७% वाढ झाली असून आयात क्षेत्रात ५.३% घट झाली आहे, असे चंद्रकांतदादांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App