ममता बँनर्जी : शाहीन बागचा बंगाली अवतार : शाळांमध्ये आज भात आणि बटाटे वाटणार

विशेष प्रतिनिधी 

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये आज शाहीनबागचा नवा अवतार दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले जनता कर्फ्यूचे आवाहन मोडून काढत मुख्यमंत्री ममता बँनर्जी या राज्यातील शाळांमध्ये आज भात आणि बटाटे वाटणार आहेत. तसे सरकारी फर्मानच ममता सरकारने काढले आहे. लोकांच्या जीवाशी हा खेळ आहे आणि तो चालवायला ममता बँनर्जी यांना अजिबात लाज वाटत नाही, असे दिसतेय. माधान्य भोजन योजने अंतर्गत शाळांमध्ये भात आणि बटाटे वाटपाचा कार्यक्रम मूळात २३ आणि २४ मार्च रोजी करण्याचा निर्णय ममता बँनर्जी सरकारने जाहीर केला होता. पण आता तो कार्यक्रम आज २२ मार्च रोजी रविवारी सकाळी १० वाजता सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे.  तसे पत्रक सरकारी पातळीवरून काढण्यात आले आहे. ममता बँनर्जी यांचा हा “शाहीनबागी हट्ट” आहे.

शाहीनबागमधील महिला आंदोलक कोरोनाच्या संकटातही तेथून हालायला तयार नाहीत. त्यांना स्वत:च्या आणि जनतेच्या जीवापेक्षा सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलन महत्त्वाचे वाटते. या आंदोलनावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी मोदी सरकार कोरोना फैलावाचा बाऊ करत आहे. त्यांना काही मीडिया हाऊस साथ देत आहेत, असा आरोप ममता बँनर्जी यांनी केला होताच. आजचे नियोजित भात आणि बटाटेवाटप हा या आरोपाचाच पुढचा भाग आहे.                                              भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय आणि राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांनी ट्विटर अकाउंटवरून हे संबधित पत्रक शेअर केले आहे. मोदींनी आज केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला मोडीत काढण्यासाठीच ममता बँनर्जी यांचा हा कुटील डाव असल्याचा आरोप अमित मालवीय आणि स्वपन दासगुप्ता यांनी केला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात