विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकशाही देशांत सरकारच्या खोट्याला पकडणे आणि फेक न्यूज रोखणे हे महत्वाचे आहे. सत्ताधाऱ्यांच्या असत्याचा बुरखा बुध्दीवंतांनी आणि सत्य जनतेसमोर आणावे असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टीस डी. वाय. चंद्रचूड यांनी केले आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सध्याच्या परिस्थितीती आरोग्याच्या बातम्यांसाठी सरकारवर अति अवलंबून राहणे योग्य नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.Intellectuals Have A Duty To Expose Lies Of State”: Supreme Court Judge D.Y.Chandrachud appeal
माजी सरन्यायाधीश एम सी छागला मेमोरियल व्याख्यानात बोलताना चंद्रचूड म्हणाले, स्वतंत्र आणि निरपेक्ष माध्यमे कोणत्याही प्रकारच्या राजकीय किंवा आर्थिक प्रभावापासून दूर असतील तरच सरकारच्या कृति आणि धोरणांना प्रश्न करू शकतात. सत्य जाणून घेण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहणे योग्य नाही. एकाधिकारशाहीवादी सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो की सत्तेची केंद्रीकरण व्हावे. त्यामुळे जगातील बहुतांश देशांनी कोरोना संदर्भातील माहिती लपविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना संसर्गाची खरी माहिती लपविण्यासाठी सरकारने कोविड रुग्णांच्या डाटामध्ये फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर न्या. चंद्रचूड यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे.
न्या. चंद्रचूड म्हणाले, फेकन्यूजचे प्रमाण वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना पॅँडेमिकच्या काळात इन्फोडेमीक झाल्याचे म्हणून फेक न्यूजविषयी चिंता केली होती. सनसनाटी बातम्यांकडे आकर्षित होण्याचा मानवी स्वभाव आहे. अनेकदा सनसनाटीपणासाठी चुकीच्या तथ्यांचा आधार घेतला जातो.
ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला खोट्या आशयासाठी जबाबदार धरले पाहिजे असे सांगताना न्या. चंद्रचूड म्हणाले लोकांनीही यासाठी जागरुक राहायला हवे. दुसºयाचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. वादचर्चांना समोरे गेले पाहिजे. सध्या आमचे सत्य आणि तुमचे सत्य यांमध्ये स्पर्धा आहे.
मात्र, एखाद्याच्या दृष्टिकोनासाठी सत्याचा आलाप करणे योग्य नाही. आपण एका प्रकारच्या इको चेंबर्सकडे झुकत चाललो आहेत. विरोधी मतांचा स्वीकार करण्याची वृत्तीच राहिली नाही. आर्थिक आणि धार्मिक रेषांनी जग विभाजित होत आहे.
आमच्या विचारधारेशी जुळणारी वृत्तपत्रेच आम्ही वातो. आपल्या विचारधारेशी मेळ खात नसलेल्या पुस्तकांकडे दूर्लक्ष करतो. एखाद्याने वेगळे मत व्यक्त केले तर टीव्ही म्युट करतो. सत्यापेक्षा आणि राजकीय दृष्टीने बरोबर कसे असू याकडेच आमचा जास्त कल असतो. फेक न्यूजचा सामना करण्यासाठी आम्हाला सार्वजनिक संस्था मजबूत कराव्या लागतात. माध्यमे कोणत्याही प्रकारच्या दबावापासून दूर राहतील याकडे आम्हाला कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. निप:क्षपातीपणे सत्य समोर आणणाºया माध्यमांची आम्हाला गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App