विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – अवकाशात अंतराळवीरांना किरणोत्सर्गाचा धोका आहे, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील (आयएसएस) संशोधकांनी काढला आहे. अंतराळ मोहिमांमध्ये किरणोत्सर्गामुळे अंतराळवीरांचे शारीरिक नुकसान किती होऊ शकते, हेही सांगण्यात आले आहे. Radiation problem for astronauts is dangerous in space
‘नेचर-सायंटिफिक रिपोर्ट’ या नियतकालिकांत एक लेख प्रसिद्ध झाला आहे. पृथ्वीवरील किरणोत्सर्गाला प्रत्येक अंतराळवीरांचा ‘डीएनए’ कसा प्रतिसाद देते याच्या अभ्यासावरुन अंतराळ मोहिमेतील ‘डीएनए’च्या परिणामांचा अंदाज कसा करू शकतो, हे शास्त्रज्ञांनी लेखात शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये गुणसूत्र बदलाचा अभ्यास करण्यात आला आहे.
संशोधनाचा भाग म्हणून ४३ अंतराळवीरांचे अवकाश मोहिमांआधी व नंतर अशा दोन वेगवेगळ्या वेळी रक्त तपासण्यात आले. मोहिमेआधी घेतलेल्या रक्ताचे नमुने हे गॅमा किरणांच्या गॅमा किरणांच्या संपर्कात आणले गेले. अंतराळ मोहिमेनंतरचे नमुने हे अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर काही महिन्यांनी करण्यात आले.
किरणोत्सर्गामुळे अंतराळवीरांच्या शरीराची किती हानी झाली आहे आणि त्याचे प्रमाण निश्चिकत करता येते का आम्हाला जाणून घ्यायचे होते. याशिवाय अंतराळवीर अवकाशात जाण्यापूर्वी अंतराळवीरांचे वय, लिंग यामुळे दिसणारा फरक यांचे निरीक्षण अंतराळवीर अवकाशात जाण्यापूर्वी करण्याजत आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App