विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी पौडवाल यांचा पाठिंबा महत्वाचा ठरणार आहे. पौडवाल यांचे केदारनाथ येथे मोठे सामाजिक कार्य आहे. आत्तापर्यंत त्यांनी १०० कोटींच्यावर विकासकामे केली आहेत. Anuradha Poudwal on the path of BJP, tied the BJP leaders on the backdrop of Uttarakhand elections
पद्मश्री पुरस्कार प्राप्त अनुराधा पौडवाल यांची केदारनाथावर विशेष भक्ती आहे. त्यामुळे याठिकाणी त्यांनी विकासकामे सुरू केली आहेत. त्यांनी नुकतीच भाजप कार्यालयास भेट देऊन नेत्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे सरचिटणिस अरुण सिंह, राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बलुनी यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजपाच्या नेत्यांना राखीही बांधली.
केदारनाथ मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना भाजपाने सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत ट्विट करताना अरुण सिंह यांनी म्हटले आहे की प्रसिध्द भक्तीगीत गायिका अनुराधा पौडवाल या केदारनाथाच्या निस्सिम भक्त आहेत. त्यामुळे या भागात त्यांनी विकासकामे सुरू केली आहेत.
मात्र, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार उत्तराखंडमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पौडवाल यांनी भाजपसोबत येणे महत्वाचे ठरणार आहे. अनुराधा पौडवाल या प्रसिध्द गायिका असून त्यांनी अभिमान या चित्रपटात श्लोक गाऊन आपली कारकिर्द सुरू केली. त्यानंतर हिंदी, मराठीसह विविध भाषांतील हजारो गाणी त्यांनी गायली आहेत. टी सिरीज या कंपनीशी जोडल्या गेल्यानंतर त्यांनी केवळ त्यांच्यासाठीच गाणी गायचा निर्णय घेतला. टी सिरीज कंपनीसाठी त्यांनी शेकडो भक्तीगीते गायली
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App