सरकारी काम अडलय का ? आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करता येणार; ऑनलाइन, ऑफलाईन सुविधा उपलब्ध

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एखादं सरकारी काम अडले असेल खूप उशीर होत असेल तर नागरिक थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करू शकतात. pmo complaint help online office of prime minister to address online complaint

अनेकदा सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. वेळ, पैसा खर्च करून देखील काम होत नाही.केंद्र सरकारद्वारे अनेक योजना सुरू आहेत. मात्र योजनांचा लाभ मिळण्यास खूप उशीर होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण सामान्य नागरिकही आपल्या तक्रारी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोचवू शकतात. पंतप्रधान कार्यालयापर्यंत ऑनलाईन तक्रार करण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी आहे. अवघ्या काही मिनिटात तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.



अशी करा तक्रार

  •  सर्वप्रथम पंतप्रधान कार्यालयाची अधिकृत वेबसाईट https://www.pmindia.gov.in/en वर जा.
  •  येथे एक ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल तिथे Interact with PM मधील Write to the Prime Minister  वर क्लिक करा
  •  येथून पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार ऑनलाईन पाठवू शकता
  •  आता तुमच्यासमोर एक CPGRAMS पेज ओपन होईल
  •  या पेजवर तक्रारी दाखल करता येतात
  •  तक्रार नोंदवल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल
  •  तक्रारीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा
  •  विचारलेली सर्व माहिती भरा
  •  तुमची तक्रार नोंदवली जाईल

ऑनलाईनबरोबर तुम्ही ऑफलाईन तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011. या पत्त्यावर पत्र पाठवता येईल. फॅक्सद्वारे तक्रारही नोंदवता येते. त्यासाठी 011-23016857 या फॅक्स क्रमांकावर फॅक्स पाठवता येईल.

pmo complaint help online office of prime minister to address online complaint

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात