काबूल विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट , ११ जण ठार ; अमेरिकेकडून हल्ल्याबाबत दुजोरा

वृत्तसंस्था

काबुल : काबूल विमानतळात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून ११ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेकडून या हल्ल्याबाबत दुजोरा देण्यात आला.
या स्फोटात किती नुकसान झालं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. Afghanistan: Suicide attack at Kabul airport, US confirms

अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ मोठा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या या स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील समोर आलेला नाही. दरम्यान, हा एक आत्मघाती हल्ला असल्याचा संशय आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले आऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अल झाझिरा न्यूजने दिले.



अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, हा बॉम्बस्फोट काबूल विमानतळाच्या एबी गेटजवळ झाला. या घटनेला दुजोरा देताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, ‘आम्ही काबूल विमानतळाजवळ या स्फोटाची पुष्टी करतो. सध्या या घटनेतील मृतांची माहिती स्पष्ट नाही. तपशील मिळाल्यावर त्याची माहिती दिली जाईल.

अमेरिकन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती बॉम्बर हल्ला होता. या हल्ल्यासोबतच अॅबी गेटजवळ गोळ्याही झाडण्यात आल्या आहेत. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. मात्र त्याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. काही तासांपूर्वी अमेरिकेने विमानतळ परिसरात आत्मघातकी हल्ला होण्याचा इशारा दिला होता आणि नागरिकांनी विमानतळापासून दूर राहण्यास सांगितले होते.

Afghanistan: Suicide attack at Kabul airport, US confirms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात