विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही.पण त्यांना अटक करण्याऎवजी समज द्यावी अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.Rane’s statement is not supported but understanding should be given instead of arrest, Chandrakant Patil
पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले,
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची स्वतःची कार्यपद्धती आहे. रावसाहेब दानवे यांची बोलण्याची स्वतःची पद्धत आहे. एखाद्या आक्षेपार्ह शब्दाच्या उच्चारणामुळे थेट अटक होऊ शकते का? त्यांना समज दिली जाऊ शकते की नाही. मी राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही. मात्र, अटक करण्याऐवज त्यांना समज द्यायला हवी.
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून शिवसेनेने राज्यभरात आंदोलन सुरू केले असून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतेही राज्य सरकार अटक करू शकत नाही.
या सरकारचा गेल्या वीस महिन्यात काहीही करता आलेले नाही. सरकारचे सल्लागार नेमके कोण आहेत? न्यायालयामध्ये सरकारने केलेले निर्णय टिकलेले नाहीत. एखाद्या शिवसैनिकाने खटला दाखल करण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, थेट अटक हे योग्य नव्हे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पंढरपुरातील भाषणात थेट चोर असे संबोधले होते. मुख्यमंत्र्यांची दसरा मेळाव्यातील भाषणे पाहिली तर किती केस दाखल करायचा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला?राज्यातील राजकीय जीवन सुसंस्कृत होते. मात्र, सध्या ते बिघडताना दिसत आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्र बसून चर्चा करायला पाहिजे असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App