मंदिरामध्ये बारपेक्षा कमी गर्दी, सोशल डिस्टन्स ठेऊन उघडण्यास काय हरकत? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

पंढरपूर : बारमध्ये जेवढी गर्दी होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
शेकापचे नेते आणि माजी दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त फडणवीस पंढरपुरात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,Bars are open but tempels are close,Devendra Fadnis criticise goverment

राज्यातील दारुची दुकाने उघडी ठेवता. मात्र, मंदिरांना बंद ठेवता हे चूक आहे. जेवढी गर्दी बार किंवा मॉलमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरांमध्ये असते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे खुली करण्यास काय हरकत आहे? अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे.



हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. किमना त्यांच्यासाठी तरी मंदिरे खुली करण्यात यावीत.राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत.

यानंतर दुकाने, मॉल, हॉटेल आदींसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे ही पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Bars are open but tempels are close,Devendra Fadnis criticise goverment

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात