विशेष प्रतिनिधी
नागपुर: पोलीसांमधील माणुसकीचे अनोखे दर्शन नागपूर येथे दिसले आहे. एका गरीब रिक्षाचालकावर वाहतूक नियमभंगाचा दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे आपल्या मुलाच्या पिगी बॅँकमधून (गल्ला) पैसे काढून दंड भरण्याची वेळ त्याच्यावर आली. मात्र, हे समजल्यावर पोलीसांमधील संवेदनशिलता जागी झाली. स्वत:च्या बालपणातील पिगी बॅँकची आठवण आली आणि पोलीसांनी या रिक्षाचालकाच्या दंडाची रक्कम स्वत: भरली. The rickshaw puller was paying the fine by bringing money from the boy’s piggy bank
नागपुरच्या कामठी भागात राहणाऱ्या रोहित खडसे या रिक्षाचालकाला पोलीसांमधील माणुसकीचे हे दर्शन घडले. खडसे हे रिक्षा चालवून आपल्या चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लोकडाऊनमुळे अगोदरच उत्पन्न कमी झाले होते. तुटपुंज्या उत्पन्नात चार सदस्यांच्या कुंटुबाचे पोट भरणेही अवघड. त्यात ९ ऑगस्ट रोजी बर्डी परिसरात त्यांनी चुकुन नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी केली. परिसरात वाहतुक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड लावला. संगणकीकृत प्रणालीतुन रोहित यांच्या रिक्षावर आधीचेही दोन दंड असल्याचे कळले.त्यामुळे दंडाची एकुण रक्कम दोन हजार झाली.
वाहतुक पोलिसांनी कर्तव्य म्हणुन रोहित यांच्याकडे दोन हजारांच्या दंडाची रक्कम मागितली. रोहित याने तेवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नाइलाजास्तव रोहित यांची रिक्षा जप्त करावी लागली. उत्पन्नाचे एकमेव साधन गेल्याने रोहित यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले. त्यांनी मित्र आणि परिचितांकडे उसने पैसे मागितले.
मात्र, सगळ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने कोठूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी आपल्या सात वर्षांच्या मुलाच्या गल्यातून पैसे काढण्याचे ठरविले. हा गल्ला फोडून त्यातुन नाण्यांच्या स्वरूपात निघालेली दोन हजार रुपयांची रक्कम एका प्लास्टिक पिशवीत भरली. ही पिशवी घेऊन रोहित सीताबर्डी वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात पोहोचले. येथील वाहतूक प्रमुख पोलीस निरिक्षक अजय मालवीय यांना वाटले की मुद्दामहून पोलीसांची चेष्टा करण्याचा प्रयत्न राहित करत आहे. त्यांनी त्याला दरडावले.
नाण्यांच्या रुपात दंडाचे पैसे का आणले, ऐवढी रक्कम मोजणार कोण अ शी विचारणा केली. हे ऐकल्यावर रोहितच्या मनाचा बांध फुटला. गहिवरून रडत रडतच त्याने आपली हकितगत मालवीय यांनी सांगितली. हे ऐकून अजय मालवीय यांना ही एका मुलाच मन मोडून असे दंड वसुल करणे रुचले नाही.मात्र,नियमाप्रमाणे दंडाची रक्कम वसुल करणे हे पोलीस म्हणुन कर्तव्यअसल्याने अजय मालवीय यांनी स्वत:कडून रोहित यांच्यावरील दोन हजारांचे दंड भरून दिला.तसेच रोहित खडसेला त्याच्या मुलाला वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात आणण्यास सांगितले.
पोलिसांच्या सांगण्यानुसार रोहित आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन वाहतुक पोलिसांच्या कार्यालयात आला तेव्हा गल्यातून काढलेले सर्व पैसे मुलांच्या हातात परत करण्यात आले. पोलीसांतील ही माणुसकी पाहून खडसे कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. यापुढे कधीही वाहतुक नियम मोडणार नाही अशी शपथ ही रोहित खडसे याने घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App