Raj Kundra Bail Plea : शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि अॅपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांनी न्यायालयात जोरदार विरोध करून आक्षेप घेतला आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, जर राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली, तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल. Raj Kundra Bail Plea opposed by Mumbai Police by saying he can leave the country like Nirav Modi and Choksi
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि अॅपद्वारे प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज कुंद्राच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांनी न्यायालयात जोरदार विरोध करून आक्षेप घेतला आहे. मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, जर राज कुंद्राची जामिनावर सुटका झाली, तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल.
राज कुंद्राच्या जामिनावर मंगळवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलिसांनी सांगितले की, राज कुंद्राची जामिनावर सुटका झाल्यास, तो अश्लील चित्रपट बनवण्याच्या काम पुन्हा सुरू करू शकतो. शिवाय तो देशाबाहेर पळून जाण्याचाही प्रयत्न करू शकतो. राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. कुंद्रा म्हणाला की, त्या आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नाही. तसेच एफआयआरमध्ये त्याचे नाव नोंदवले गेले नाही. त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा.
कुंद्राच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, ज्या आरोपींची नावे आरोपपत्रात नमूद आहेत, त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टाने माझा जामीन फेटाळून चूक केली आहे. सर्व ऑर्डर अंदाजावर आधारित आहेत. त्यामुळे ते रद्द करावे. कथित गुन्ह्यात त्याच्या सहभागाचा पुरावा नाही. दंडाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. राज कुंद्राने आपल्या जामीन अर्जात हे युक्तिवाद दिले आहेत.
या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी सांगितले की, हे गंभीर गुन्ह्याचे प्रकरण आहे. आम्ही सर्व व्हिडिओ कुठे अपलोड केले आहेत याचा तपास करत आहोत. जर आरोपींना जामीन मिळाला तर ते पुन्हा गुन्ह्याची पुनरावृत्ती करू शकतात. त्याचा आपल्या संस्कृतीवर परिणाम होईल. यामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल.
पुढे, मुंबई पोलिसांनी म्हटले की, कुंद्रा हा फरार आरोपी प्रदीप बक्षीचा नातेवाईक आहे. कुंद्रा एक ब्रिटिश नागरिक आहे. जर त्याची जामिनावर सुटका झाली, तर तो नीरव मोदी आणि मेहुल चोकसीसारखा फरार होण्याची शक्यता आहे. तो परदेशात जाईल आणि तेथून आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ अपलोड करेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी घेतलेल्या या हरकती न्यायालयाने काळजीपूर्वक ऐकल्या.
खरे तर पोलीस राज कुंद्राला पॉर्नोग्राफी रॅकेटचा सूत्रधार मानत आहेत. रिकव्हर केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्स या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा परदेशात प्रसार दर्शवितात. कुंद्राच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी आता 20 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Raj Kundra Bail Plea opposed by Mumbai Police by saying he can leave the country like Nirav Modi and Choksi
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App