विशेष प्रतिनिधी
मुंबई : IDBI बँकेने सहायक व्यवस्थापक पदांसाठी भरती काढली आहे. पात्र उमेदवार या श्रेणी ए पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी इच्छुकांना बँकेची अधिकृत वेबसाइट idbibank.in वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या नोकऱ्यांसाठी अर्ज सुरू झाले असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट आहे. रिक्त पदांची एकूण संख्या 650 आहे.IDBI Bank Assistant Manager Recruitment 2021 Apply For 650 Grade A Posts
बँकेने 1 वर्षाच्या पदव्युत्तर पदविका बँकिंग आणि वित्त (PGDBF) उमेदवारांना अर्ज मागवले आहेत. यात कॅम्पसमध्ये 9 महिन्यांचा वर्ग अभ्यास आणि IDBI बँक शाखांमध्ये 3 महिन्यांची इंटर्नशिप असते. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना पीजीडीबीएफ प्रमाणपत्र दिले जाईल. यानंतर त्यांना IDBI बँकेत सहायक व्यवस्थापक ग्रेड ‘A’ची नोकरी दिली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी ज्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 55% गुणांची अट आहे. उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावी. SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आणि सामान्य उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App