वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी टीमला ब्रिटनच्या महिला हॉकी टीमने 4 – 3 असे पराभूत केले. भारतीय महिला हॉकीपटूनां मैदानावरच रडू कोसळले. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या दुःखावर हळूवार शब्दात फुंकर घातली आहे. You did not win medals, but you won the hearts of millions of Indians; The President lifted the spirits of the women’s hockey team
"Indian Women's Hockey team excelled on the field and won the hearts of every Indian with their stellar performance. We are proud of you all," says President Ram Nath Kovind (file photo) pic.twitter.com/VHU5aVeVVS — ANI (@ANI) August 6, 2021
"Indian Women's Hockey team excelled on the field and won the hearts of every Indian with their stellar performance. We are proud of you all," says President Ram Nath Kovind
(file photo) pic.twitter.com/VHU5aVeVVS
— ANI (@ANI) August 6, 2021
महिला टीमला उद्देशून राष्ट्रपती म्हणाले, की तुम्ही पदक जिंकले नसते तरी तुमच्या खेळाने करोडो भारतीयांची मने तुम्ही जिंकली आहेत. तुमचा पराक्रम अतुलनीय आहे. खेळामध्ये हार – जीत होत असते. परंतु मैदानावर टिकून राहणे आणि कमबॅक करणे तसेच आपल्यातले फायटिंग स्पिरिट टिकवून ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ते तुम्ही केलेत. सामन्यामागून सामने जिंकत तुम्ही करोडो भारतीयांना अभिमान वाटेल, असा खेळ केलात. भारतीयांची ह्रदये तुम्ही जिंकली आहेत, असे शब्दांत राष्ट्रपतींनी भारतीय महिला हॉकी टीमचे कौतूक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माहिती – प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर आदि नेत्यांनीदेखील महिला हॉस्पिटल हॉकी टीमचे कौतुकच केले. सोशल मीडियावर देखील महिला हॉकी टीमच्या जबरदस्त परफॉर्मन्स बद्दल चर्चा चालू असून अनेकांनी त्यांच्या मेहनतीवर सकारात्मक कमेंट केल्या आहेत. आपल्या महिलांनी जीव तोडून मेहनत केली. परंतु त्यांना यश येऊ शकले नाही. आपले मनोधैर्य खचू न देता त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुढच्या ऑलिंपिकमध्ये त्यांना नक्की यश मिळेल, अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App