विशेष प्रतिनिधी
कोलकता : साचलेले पाणी काढायच्या नावाखाली ६३ वृक्ष तोडल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने उद्योजक सौमित्र कांती डे यांना तब्बल ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. Huge fine for tree cutting
संबंधित जागेवर सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्याचा डे यांचा विचार असल्याचा दावाही सरकारने केला होता. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे कायमस्वरुपी नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित व्यक्तीला १५ दिवसांत ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, ज्या ठिकाणी वृक्षतोड केली त्याचठिकाणी १०० झाडे लावण्याचा आदेश दिला आहे.
खासगी मालमत्तेच्या आवारात साचलेले पाणी काढून टाकण्याची कोलकता महापालिकेकडून नोटीस मिळाल्याने पाणी काढण्यासाठी झाडे तोडावी लागली, असा दावा डे यांनी केला होता. मात्र, पाणी काढून टाकण्याचा आणि वृक्षतोडीचा काहीही संबंध नव्हता, असा दावा पश्चिकम बंगाल सरकारने केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App