विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – सर्वांत अधिक कार्बन फूटप्रिंट असणाऱ्या कंपन्या या अल्पकाळासाठी गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात पण दीर्घकाळाचा विचार केला तर याचा मोठा तोटाच होण्याचा धोका अधिक असतो.Investment in polluted companies dangerous
कारण हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाला पायबंद घालण्यासाठी विविध देशांकडून अशा कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घातले जात असल्याचे आयआयटी गुवाहाटी आणि आयआयएम बंगळूरमधील संशोधकांनी म्हटले आहे.
सध्या जगाची वाटचाल ही चिरंतन विकास आणि भविष्याच्या दिशेने सुरू असून बड्या अर्थव्यवस्था त्यांची कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा कंपन्यांचे भवितव्य अनिश्चि त असल्याचे या अभ्यासकांनी म्हटले आहे. या यादीतील ७१.६ टक्के कंपन्यांनी २०१६ ते २०१९ या काळामध्ये त्यांचे कार्बन उत्सर्जन कमी दाखविले आहे, असेही संशोधकांकडून सांगण्यात आले.
या संस्थांनी कंपन्यांची कार्बन फूटप्रिंट आणि अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या संस्थांसमोरील संभाव्य धोके यांचा वेध घेतला होता. या अभ्यासकांनी अमेरिकेच्या मार्केटमध्ये नोंदणी असणाऱ्या दोनशे बड्या कंपन्यांचा अभ्यास केला होता.
याबाबतचे संशोधन ‘एआरएक्सआयव्ही’ या संशोधनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्लॅटफॉर्मवर विस्ताराने प्रसिद्ध करण्यात आले आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ या प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App