विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – शस्त्र परवान्यांच्या वाटपातील अनियमिततेवरून सीबीआयने जम्मू आणि काश्मीलरमधील ४० ठिकाणांवर छापे घातले. हजारो अनिवासी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे हे शस्त्रवाटप झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.CBI raids in J and K
जम्मू, श्रीनगर, उधमपूर, राजौरी, अनंतनाग, बारामुल्ला आणि दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांची कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे घालण्यात आले असून यामध्ये काही आयएएस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
शस्त्रवाटप करणाऱ्या २० संस्था ‘सीबीआय’च्या रडारवर असून या सगळ्यांनी एक मोठे रॅकेटच चालविले होते, असे तपाससंस्थेकडून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शाहीद इक्बाल चौधरी आणि निरजकुमार या दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची सीबीआयकडून झाडाझडती घेण्यात आली.
याचप्रकरणी सीबीआयने २०१९ मध्ये देखील मोठी कारवाई करतानाच श्रीनगरसह डझनभर ठिकाणांवर छापे घातले होते. यामध्ये श्रीनगर, जम्मू, गुडगाव आणि नोएडा येथील सरकारी कार्यालयांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App