जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक, 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

Security Forces Killed 5 terrorist in Encounter in Pulwama Jammu Kashmir

Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांसह एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान सैन्यातील एक जवानही शहीद झाला आहे. Security Forces Killed 5 terrorist in Encounter in Pulwama Jammu Kashmir


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांसह एका साथीदाराचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान सैन्यातील एक जवानही शहीद झाला आहे.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन या गावात घेराबंदी करून शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केल्यामुळे ही कारवाई चकमकीत बदलली. या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिले.

सुरुवातीच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला, त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवले आली आणि चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या चार दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तैयबाशी असून एक मूळचा पाकिस्तानी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा येथील दानिश मंजूर, पाकिस्तानचा रेहान, निषाद हुसेन लोना ऊर्फ ​​खिताब आणि हाजन पायीनचा आमिर वागिया अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एकाची ओळख पटलेली नाही.

Security Forces Killed 5 terrorist in Encounter in Pulwama Jammu Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण