विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लहान मुलांना सप्टेंबरमध्ये कोरोनाविरोधी लस देणे शक्य आहे, अशी माहिती दिल्ली येथील एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. Aiims chief Randeep Guleria says india to get corona vaccine for children above 2 yrs by september
सध्या १८ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा कठीण प्रसंगी लहान मुलाच्या लसीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, तिसऱ्या लाटे संदर्भात सरकार आतापासून तयारी करत आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणावर मोठा भर दिला जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर अधिक परिणाम होऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे.
एम्स पाटणा आणि दिल्ली येथे २ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची चाचणी सुरू आहे. डीसीजीआयने मुलांवर फेज एक आणि तीन चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती.
मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकेल
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोव्हॅक्सिनच्या फेज एक आणि तीनच्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच झायडसची लस चाचणीच्या लाईनमध्ये आहे. मान्यता मिळाल्यास ती मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते. तसेच कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App