Phone Taping; पेगासस कंपनीनेच फोन टॅपिंगच्या बातम्या फेटाळल्या; अनोळखी सूत्रांच्या आधारे खोटारडे रिपोर्टिंग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ज्या फोन टॅपिंगवरून विरोधकांनी संसदेत गदारोळ करायला सुरूवात केली आहे, त्या फोन टॅपिंगच्या बातम्या पेगासस कंपनीनेच फेटाळून लावल्या आहेत. भारतातले मंत्री, खासदार यांच्या फोन टॅपिंग करून त्यांच्यावर हेरगिरी केल्याच्या सगळ्या बातम्या चुकीच्या गृहीतकांवर आधारित आणि पूर्णपणे खोटारड्या आहेत, असे स्पष्टीकरण पेगासस कंपनीने केले आहे.Phone Taping; The Pegasus company itself denied reports of phone tapping; False reporting based on unknown sources

ज्या माध्यमांनी त्या बातम्या छापल्या आहेत, त्यांनी अनोळखी सूत्रांनी दिलेल्या माहितीचा आधार घेतला आहे. ती अनोळखी सूत्रे आणि त्यांनी दिलेली माहिती पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही. डॉक्युमेंट्स नाहीत.



अनोळखी सूत्रांनी दिलेल्या माहितीत सत्य तर नाहीच. पण त्या सूत्रांच्या आणि त्या सूत्रांच्या माहितीच्या आधारे बातम्या छापणाऱ्यांच्या विश्वसनीयतेविषयीच आता बळकट शंका घेण्यास वाव आहे, असे ट्विट पेगासस कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केले आहे.

या अनोळखी सूत्रांनी केलेले माहिती असल्याचे दावे आणि त्या आधारावर त्यांनी केलेले विश्लेषण हे दोन्ही दिशाभूल करणारे आहे, असेही पेगाससने आपल्या ट्विटमध्ये पुढे नमूद केले आहे.

संसदेत गदारोळ

पेगासस कंपनीने काही मंत्र्यांचे, खासदारांचे आणि अधिकाऱ्यांचे फोन टॅप करून त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप विरोधी खासदारांनी संसदेत करून गदारोळ घालण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पेगासस कंपनीने खुलासा करून विरोधकांच्या दाव्यातली हवा काढून घेतली आहे.

Phone Taping; The Pegasus company itself denied reports of phone tapping; False reporting based on unknown sources

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात