प्रतिनिधी
मुंबई – भोसरी भूखंड प्रकरणात राजीनामा द्यवा लागलेले भाजपचे माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयांच्या ED कोठडीच्या मुदतीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. After meeting with eknath khadse sharad pawar met CM uddhav thackeray at “Varsha”
या भेटीनंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गेले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार शरसंधान साधले होते. त्यावरून महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस चालू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. जवळपास अर्धा तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली.
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या ED कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
नाना पटोले यांच्या विधानावरून असलेली नाराजी आणि महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये काही खलबते झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक कशी घेता येईल? या चर्चेतला तपशील अजून बाहेर आलेला नाही. मात्र, या पवार – ठाकरे यांच्या भेटीपूर्वी एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीत या ED चा ससेमिरा चुकविण्याच्या विषयावर काही चर्चा झाली का? याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App