रायबरेलीला देणार स्मृती इराणी ‘दिशा’ ! ; इराणींच्या हाताखाली सोनिया गांधी यांना करावे लागणार काम


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ग्रामविकास मंत्रालयाच्या जिल्हा विकास समन्वय व देखरेख समितीच्या (दिशा) रायबरेली जिल्हाध्यक्ष पदावर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे सोनिया गांधी यांना उपाध्यक्षपद दिले आहे. आता त्या इराणींच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज पाहतील. त्यामुळे आता स्मृती इराणी अमेठीसह रायबरेलीसही ‘दिशा’ देणार आहेत. Sonia Gandhi was removed from the post of disha; smriti Irani became the chairperson.

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने संसद, राज्य विधीमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था (पंजायती राज संस्था आणि नगरपालिका, महापालिका) यांच्यामध्ये सुयोग्य समन्वय, कार्यक्षमतेने विविध योजनांची अंमलबजावणी, चौफेर विकास यासाठी जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीची (डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कोऑर्डीनेशन अँड मॉनिटरिंग कमिटी – दिशा) स्थापना केली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती मंत्रालयातर्फे केली जाते. या पदांवर त्या त्या भागातील लोकसभा प्रतिनिधींची निवड करण्यात येते.

त्यानुसार रायबरेली जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी यांची नियुक्ती केली. यापूर्वी २०१८ साली रायबरेली दिशा समितीच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी तर उपाध्यक्षपदी अमेठीचे तत्कालीन खासदार राहुल गांधी यांची निवड केली होती.

गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी येथून तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव २०२९ सालच्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी केला होता. निवडणुकीपूर्वीच पराभवाच्या भीतीमुळे राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड येथूनही निवडणूक लढवली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री इराणी आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातही सक्रीय होत आहेत. गांधी कुटुंबाच्या या दोन पारंपरिक मतदारसंघांमध्ये विकासाचा मोठा अनुशेष आहे. ते नेमकेपणाने हेरून इराणी यांनी काम केले होते आणि २०१९ मध्ये अमेठीतून विजय मिळविला होता. आता रायबरेलीमध्येही त्या सक्रीय झाल्या आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.

विधानसभा निवडणुकीमध्ये परिणाम ?

उ.प्र. विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने अमेठी आणि रायबरेलीवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. ‘दिशा’ समितीच्या अध्यक्षपदावरून काँग्रेसला पहिला शह दिला आहे. त्यातच रायबरेलीमधील काँग्रेस आमदार आदिती सिंह या स्वतंत्र बाण्यासाठी ओळखल्या जातात. काँग्रेस नेतृत्वासोबतही त्यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sonia Gandhi was removed from the post of disha; smriti Irani became the chairperson.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण