भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या ED कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ


वृत्तसंस्था

मुंबई – भोसरी MIDC भूखंड घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खड़से यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या सक्तवसूली संचलनालयाच्या ED च्या कोठडीत ठेवण्याच्या मुदतीत न्यायालयाने वाढ केली आहे. त्यांना आता १९ जुलै पर्यंत ED च्या कोठडीत राहून पुढच्या चौकशीला आणि तपासाला सामोरे जावे लागेल. NCP leader Eknath Khadse’s son-in-law Girish Choudhary has been remanded to Enforcement Directorate custody till July 19 in a money laundering case.

पैशाची अफरातफर केल्याचा त्यांच्या वर आरोप आहे. गिरीश चौधरी यांना ईडीने दोन आठवड्यांपूर्वी अटक केली आहे. ते सध्या कोठडीतच आहेत. ज्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून राजीनामा द्यावा लागला होता, त्याच घोटाळ्याच्या प्रकरणात खडसेंच्या जावयांना ED ने अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी पुढे गेल्यानंतर स्वतः खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.

तब्येत बरी नाही म्हणून गेल्याच आठवड्यात एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद रद्द केली होती. परंतु, ED चे समन्स आल्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागले होते. त्या दिवशी त्यांची ED च्या अधिकाऱ्यांनी सुमारे ९ तास चौकशी केली होती.

NCP leader Eknath Khadse’s son-in-law Girish Choudhary has been remanded to Enforcement Directorate custody till July 19 in a money laundering case.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण