विनायक ढेरे
नाशिक – महाभारतात त्याच्या गुरूंनी कर्णाला सांगितले होते, की शल्याला सारथी नेमू नको. तुझे नुकसान होईल. रथाचे सारथ्य उत्तम होईल. पण त्याच्या बोलण्याने अवसानघात होईल. कर्णाने कोणाचे ऐकले नाही. त्याने शल्याला सारथी नेमले. शल्य रणमैदानात सातत्याने असे काही बोलत राहिला की त्यामुळे कर्णाचा मनोभंग आणि तेजोभंग झाला. pankaja munde flexs political muscle; a different story of mahabahata`s Shalya
त्याचा परिणाम कर्णाच्या युध्दकौशल्यावर झाला नाही. पण त्याच्या मानसिक अवस्थेवर झाला. कर्ण युध्दकौशल्यात कमी पडला म्हणून हरला नाही. तो निर्णायक क्षणी चूकीचा निर्णय घेतल्याने हरला.
आजच्या मुंबईतल्या मेळाव्यात महाभारताचेच दाखले देणाऱ्यांना हे माहिती नाही काय़…?? कौरव पांडवांच्या नुसत्या गोष्टी वाचून महाभारत समजत नाही. त्यातले इंगित समजावे लागते. तरच त्यातून आपल्या राजकारणाला मार्गदर्शन मिळते. नाही तर महाभारतावर प्रवचने करणारे थोडे नाहीत. ते सगळेच त्यातल्या दृष्टांतानुसार राजकारणात यशस्वी झालेले दिसले असते. पण तसे घडलेले नाही.
महाभारतातल्या गोष्टींचे दृष्टांत देणे वेगळे आणि तसे आचरण करून त्यातला सिध्दांत आपल्या राजकारणात अमलात आणणे निराळे. हे मुंबईत मेळावा भरवणाऱ्यांना समजले आहे काय…??
महाभारतात कर्ण वेगळा होता आणि शल्य वेगळा होता. पण इथे तर शल्य आणि कर्ण एकच शल्याच्या रूपात दिसू लागलेत. आता कोणी शकुनीच्या नादी लागून आपल्या स्वतःच्या राजकारणाचा स्वतःच शल्य व्हायला निघाले असेल, तर कोण काय करणार…??
भले मग त्या शल्याला कोणा भीष्म पितामहांनी, कृपाचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी हस्तिनापूरात बोलवून समजावले असेल. चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. अखिल भारतीय राजकारणाचा विशाल पट उलगडून दाखविला असेल. पण त्या शल्याला आपल्याच कोषात अडकून पडायचे असेल, तर त्याला भीष्मपितामह, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य तरी काय करणार…?? शेवटचा चॉइस जर स्वतःच शल्य करणार असेल तर त्याला ते तरी काय करणार…??
शल्याने आपल्याला नेता म्हणावे, यासाठी भीष्म पितामहांनी, कृपाचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी त्याला हस्तिनापूरात बोलवून चार युक्तीच्या गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या. की त्याने नेता म्हटल्याने त्यांचे नेतेपद शाबूत राहणार आहे, अशातला देखील भाग नाही. पण शल्य या तिघांना आज नेता म्हणालाय, ते तिघे सोडून चौथ्याला डिवचण्यासाठी. हे उघड आहे. पण त्याने देखील फारसा फरक पडणार नाही.
कारण शल्याने केलेला तेजोभंग कर्णाच्या अंतिम पराभवास कारणीभूत ठरला. इथे तर शल्य स्वतःहून स्वतःला पराभवाच्या खाईत लोटत चालल्याचे दिसते आहे. रणमैदान येण्यापूर्वी शामियाना घातलेल्या शिबिरांमध्ये राणा भीमदेवी थाटाची भाषणे करणे निराळे आणि प्रत्यक्षात रणमैदानात उतरून लढाई करणे निराळे हे शल्याने लक्षात घेतले पाहिजे… बाकी चॉइस तर त्याला मोकळा
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App