Shiv sena MP sanjay Raut : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथे कार्यकर्त्यांसमोर म्हटले होते की, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. स्वबळाचा नारा दिल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद उफाळला असून महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तथापि, यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यापासून घुमजाव करत माझा आरोप राज्य नव्हे तर केंद्र सरकारवर होता असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Shiv sena MP sanjay Raut Remark On Nana Patoles Comment on Vigilance by CM Thackeray and Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथे कार्यकर्त्यांसमोर म्हटले होते की, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. स्वबळाचा नारा दिल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद उफाळला असून महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तथापि, यानंतर नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यापासून घुमजाव करत माझा आरोप राज्य नव्हे तर केंद्र सरकारवर होता असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये. मला असं वाटत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन विधान केलं असं वाटत नाही. राजकारणात पाळत ठेवणं याचे खूप वेगवेगळे संदर्भ असतात. मलाही सरकारची सुरक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची माहिती घेतली जाते. आपण कुठे जातो? काय करतो? कुठे गेल्यामुळे धोका आहे? एखाद्या अतिविशिष्ट व्यक्तीला सुरक्षा दिल्यानंतर त्याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले हे अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी हा विषय फार गांभीर्याने घेऊ नये. आम्हीसुद्धा घेत नाही. अशी विधानं होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, असा सल्ला राऊतांनी दिला.
दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिपदावरही प्रतिक्रिया दिली. राजकारणातली नारायण राणे यांची कारकीर्द मोठी आहे. तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका. त्या तुलनेने कमी महत्त्वाचं खातं दिलं का? असा माझा प्रश्न होता. तो विषय संपला आता. त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. नक्कीच त्याचा महाराष्ट्राला, देशाला फायदा होईल. त्यांचं काहीही म्हणणं असू द्या. माझा विषय संपला असल्याचं राऊत म्हणाले.
Shiv sena MP sanjay Raut Remark On Nana Patoles Comment on Vigilance by CM Thackeray and Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App