हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

वृत्तसंस्था

सिमला : हिमाचलप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह ( वय ८७ ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. तब्बल सहा वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. former himachal pradesh chief-minister congress leader virbhadra singh pases

कोरोनातून ते मुक्त झाले होते. त्या नंतर ते बरेच दिवस आजारी होते. सुमारे दोन महिने त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेले तीन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. आज पहाटे ३.४० वाजता सिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज एंड हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव त्यांचे घर होली लॉज येथे नेण्यात आले आहे.



दरम्यान, त्यांच्या निधनामुळे हिमाचल प्रदेशात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केला आहे. निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसच्या नेतेमंडळी त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाली आहेत.

प्रदीर्घ राजकीय वाटचाल

वीरभद्र सिंह यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ आहे. काँग्रेसचे नेते आणि ९ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार म्हणून ते निवडून आले होते. तब्बल सहा वेळा ते मुख्यमंत्री बनले होते. सध्या ते सोलन जिल्ह्यातील आरकी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

former himachal pradesh chief minister congress leader virbhadra singh pases

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात