विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – शिवसेनेतून बाहेर पडावे लागल्यानंतर नारायण राणे यांचा राजकीय विजनवास हा त्यांच्या राजकीय कुवती बरहुकूम भाजपमध्ये येऊन संपला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवून महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला आहे. congress did nothing in 12 years, BJP did it within one and half year, Narayan Rane will perform better for BJP in maharashtra
नेमका हाच मुद्दा त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी उचलला आहे. काँग्रेसला जे बारा वर्षांमध्ये जमले नाही, ते भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षांमध्ये करून दाखविले आहे. राणे कुटुंबीय भाजपचे कार्यकर्ते म्हणून पक्ष नेतृत्वाचे ऐकतील, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जायला सांगितले तर आमची काही हरकत नाही. व्यक्तिगत कटुतेपेक्षा पक्ष संघटना महत्त्वाची आहे, असे नितेश राणे म्हणाले.
शरद पवारांसारखाच नारायण राणे यांचाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा अभ्यास आहे. भाजप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढविण्याचे काम आम्ही करू. काँग्रेसला हे बारा वर्षांमध्ये जमले नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वक्षमतेचा उपयोग त्यांना करून घेता आला नाही. भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मला आमदार केले आहे. इथून पुढतच्या कोणत्याही निवडणूकीत कमळ चिन्हावर जे निवडणूक लढवतील, ते आमचे उमेदवार मानून आम्ही काम करू, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
नारायण राणे यांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घेताना सोनिया गांधींनी मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते. त्या अटीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तुलनेने दुय्यम खाते देखील स्वीकारले होते. त्यांनी काही वर्षे काँग्रेसमध्ये वाट पाहिली.
काँग्रेसचे राजकीय दिवस चांगले असताना नारायण राणे यांना राज्यातल्या कॅबिनेट मंत्रीपदाखेरीज दुसरे काहीही दिले नाही. सोनिया गांधी तर त्यांना दिलेले मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन देखील विसरल्या होत्या.
राणे यांनी सोनिया गांधींची भेट घेण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. जेव्हा त्यांना दिल्लीत जाऊनही भेट नाकारण्यातच आली तेव्हा नारायण राणेंचा शिवसेनेतला आक्रमक स्वभाव उफाळून आला आणि त्यांनी थेट सोनिया गांधींवरच आश्वासन न पाळल्याची जाहीर तोफ डागली होती. अखेरीस त्यांना काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले होते. हा नितेश राणे यांच्या वक्तव्यामधला संदर्भ होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App