विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळातून ज्या ५ मंत्र्यांनी राजीनामा दिलाय त्यामध्ये कर्नाटकातील नेते सदानंद गौडा यांचा समावेश आहे. त्याचवेळी कर्नाटकमधल्या खासदार शोभा करंदलजे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होतोय, याचा अर्थ राजकीय निरीक्षक कर्नाटकात मोठ्या बदलाची नांदी असल्याचा लावत आहेत. PM Modi Cabinet Expansion; Sadanad Gauda`s resgnation and shobha karandalje`s inclusion may lead major political change in karnataka
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट विस्तारापूर्वी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची चर्चा आहे. त्यामध्ये ज्या मंत्र्यांची कामगिरी मोदींना कमी वाटली, त्यांना ते राजीनामा द्यायला लावतील, अशा अटकळी बांधण्यात आल्या होत्या. त्या खऱ्या मानल्या तरी या निकषात रमेश पोखरियाल निशंक आणि सदानंद गौडा कितपत बसतात या विषयी शंका आहे. पण कोविडनंतर सातत्याने तब्येत बिघडत असल्याचे कारण निशंक यांच्या राजीनाम्यासाठी दिले गेले आहे.
पण सदानंद गौडांचे तसे नाही. मूळात गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटक भाजपमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात भाजपमधूनच कुरबुरी सुरू आहेत. त्यांच्या मुलाचा कारभारात हस्तक्षेप वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा वेळी कर्नाटकात नेतृत्व बदल होऊ शकतो.
पण हे केल्यानंतर येडीयुरप्पा गट नाराज होऊ नये, म्हणून त्यांच्या निकटवर्ती शोभा करंदलजे यांना कॅबिनेटमध्ये स्थान दिल्याचे बोलले जात आहे. अर्थात हे सर्व चर्चेच्या आणि अटकळींच्या पातळीवर आहे.
जसा विचार राजकीय विश्लेषक करतात, तसा मोदी करतीलच याची खात्री नाही. किंबहुना उलटी खात्री आहे. पण सदानंद गौडांचा राजीनामा, शोभा करंदलजेंचे मंत्रिमंडळ विस्तारात नाव असणे आणि येडियुरप्पांच्या विरोधातील असंतोष या राजकीय साखळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर कर्नाटकात मोठ्या बदलाची ती नांदी ठरू शकते, हे समजण्यास वाव आहे. तसेही कर्नाटकाला थावरचंद गेहलोत यांच्या रूपाने नवे राज्यपाल मिळाले आहेतच. पुढचाही बदल नजीकच्या काळात होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App