Dilip Kumar : बॉलीवूडचे महानायक, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी 7.30 वाजता खारमधील रुग्णालयात निधन झाले. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांच्या प्रकृतीविषयी सातत्याने चाहत्यांना माहिती देत होत्या. महानायकाच्या एक्झिटनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे प्रेमप्रकरण त्या काळी प्रचंड गाजले होते. ही अधुरी पण हूरहूर लावणारी प्रेमकहाणी आजही चाहत्यांच्या स्मृतीत आहे. Bollywood Tragedy King Dilip Kumar Death, Know Dilip kumar Madhubala Love story
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूडचे महानायक, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी 7.30 वाजता खारमधील रुग्णालयात निधन झाले. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांनी वयाच्या 98व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांच्या प्रकृतीविषयी सातत्याने चाहत्यांना माहिती देत होत्या. महानायकाच्या एक्झिटनंतर बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे प्रेमप्रकरण त्या काळी प्रचंड गाजले होते. ही अधुरी पण हूरहूर लावणारी प्रेमकहाणी आजही चाहत्यांच्या स्मृतीत आहे.
मधुबाला बॉलीवूडची लावण्यवती नटी. तिच्या सौंदर्यावर अनेक पुरुष घायाळ होते. आपल्या निरागस चेहऱ्याने ती कुणालाही आकर्षित करत होती. ती मात्र एकाच व्यक्तीसाठी जगत होती ते म्हणजे दिलीप कुमार. मधुबाला आणि दिलीप कुमार ‘तराना’ सिनेमाचे शुटिंग करत होते. पहिल्यांदाच दोघे एका सिनेमात एकत्र काम करत होते. मधुबाला दिलीप कुमार यांना पसंत करत होती, परंतु त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यास तिली भीती वाटत होती. दिलीप साहेब तिच्या प्रेमाला नाकारतील अशी तिच्या मनात भीती होती. परंतु एक दिवस मधुबालाने हिंमत करून दिलीप साहेबांना यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रासोबत लाल गुलाबही पाठवले. पत्रात मधुबालाने लिहिले, ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि जर तुम्हीही करत असाल तर या गुलाबाचा स्वीकार करा अथवा पुन्हा परत पाठवा.’
दिलीप कुमार यांनी मधुबालाच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि ते गुलाब आपल्याकडे ठेवले. असे म्हटले जाते, की मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर खूप प्रेम करत होत्या. त्यांच्यासमोर कुणी दिलीप कुमार यांचे नावदेखील घेतले तर त्या लाजायच्या. दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेमकहाणी ‘तराना’च्या सेटवर सुरू झाली आणि ‘मुघल-ए-आझम’ची शूटिंग पूर्ण होता-होता संपुष्टात आली. मधुबाला यांना शूटिंगशिवाय इतर कार्यक्रम किंवा पार्ट्यामध्ये जाण्यास त्यांच्या वडिलांची परवानगी घ्यावी लागत होती. शूटिंग सेटवरसुद्धा त्या कुणाला भेटू शकत नव्हत्या. हे मधुबाला यांचे प्रेम म्हणा अथवा वडिलांचा आदर. मधुलाबा यांचे वडील दोघांच्या प्रेमाविरोधात होते, तरीदेखील दोघे एकमेकांना भेटण्यासाठी काहीतरी बहाणा काढत होते.
मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. मात्र, मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना हे नाते पसंत नव्हते. मधुबाला कोणाच्याही प्रेमात पडू नये असे त्यांना वाटत होते. त्यांनी दिलीप कुमार यांना रिजेक्ट केले होते. त्यावेळी ‘नया दौर’ सिनेमात दिलीप यांच्यासोबत मधुबालाला साइन करण्यात आले होते. शूटिंग मुंबई बाहेर होणार होते. परंतु मधुबालाच्या वडिलांनी तिला मुंबई बाहेर जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने सिनेमात मधुबालाला काढून वैजयंतीमालाला घेतले. सिनेमा साइन करून काम करण्यास नकार दिल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांनी मधुबालावर खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात गेले. दिलीप कुमार यांनी मधुबालाऐवजी बी.आर.चोप्रा यांना साथ दिली. त्यामुळे मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झाले होते.
‘इन्सानियत’ सिनेमाच्या प्रीमिअरवेळ एकत्र पोहोचून दोघांनी सर्वांना दाखवून दिले की ते कुणाचीही पर्वा करत नाहीत. त्यानंतर दिलीप कुमार यांनी मधुबालाच्या वडिलांना पत्र पाठवून मधुबालासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मधुबाला यांच्या वडिलांनी दिलीप यांच्या या प्रस्तावाला धुडाकावून लावले. 1956 मध्ये ‘धाके की मलमल’च्या शूटिंगवेळी दिलीप कुमार यांनी अभिनेता ओमप्रकाश यांच्यासमोर मधुबालासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु दिलीप यांना एक अट ठेवली की लग्नानंतर ते मधुबालाला तिच्या वडिलांना भेटू देणार नाहीत. मधुबाला यांना वडील आणि दिलीप दोघेही चाहते होते, तिला दोघांपैकी एकाला निवडायचे होते, यात तिने आपल्या वडिलांची निवड केली. त्यानंतर दिलीप कुमार तिच्यापासून दूर गेले.
काही दिवसानंतर दोघांनी ‘मुघल-ए-आझम’ सिनेमातील एक सीन शूट केला, त्यामध्ये सलीम अनारकलीला थोबाडीत मारतो. या सीनमध्ये दिलीप कुमार यांनी थोबाडीत मारण्याचा अभिनय करण्याऐवजी खरंच मधुबालाच्या थोबाडीत मारली होती. सेटवर शांतता होती, लोक शांत होते आणि मधुलाबा शांतपणे उभ्या होत्या. तेव्हा सिनेमाचे दिग्दर्शक के. आसिफ यांनी मधुबालाला सांगितले की, त्यांची थोबाडीत मारण्यामागील भावनाच सांगते की ते आजही तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात.
काही काळानंतर किशोर कुमार मधुबालाच्या आयुष्यात आले आणि दोघांनी लग्न केले. तसेच दिलीप यांनी सायरा बानोसोबत लग्न केले. कालचक्र सुरू राहिले, परंतु मधुबालाच्या मनातील दिलीप यांनी जागा कधीच किशोर कुमार घेऊ शकले नाहीत. मधुबालाने आजारपणामुळे वयाच्या 32व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या अखेरीस ती दिलीप कुमार यांच्यासोबत बोलायला लागली होती आणि त्यांच्यासोबत पुन्हा सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Bollywood Tragedy King Dilip Kumar Death, Know Dilip kumar Madhubala Love story
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App