विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात सर्वत्रच सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या मदतीसाठी आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली आहेत. याबाबतच्या तक्रारींवर राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाईनच्या मदतीने आत्तापर्यंत ३.१३ कोटी रुपये परत मिळविण्यात यश मिळाले आहे.The Union Home Ministry, with the help of the National Helpline, paid Rs 3.13 crore in three months to help the victims of cyber fraud.
केंद्रीय गृह मंत्रालयाने १ एप्रिल रोजी सात राज्यांत ही हेल्पलाईन सुरू केली आहे. १६ जून रोजी ही देशातील सर्व राज्यांत काम सुरू झाले आहेत. आत्तापर्यंत १५ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांमध्ये हेल्पलाईन सक्रीयपणे सुरू आहे.
हेल्पलाईन सुरू झाल्यावर काही दिवसांतच फसवणुकीचे बळी ठरलेल्यांना दिलासा मिळायला लागला आहे. दिल्लीतील शाहदरा परिसरातील राम प्रकाश या ज्येष्ठ नागरिकाची चार जून रोजी सायबर फसवणूक झाली होती. त्यांची ३.२ ला रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांनी त्वरित १५५२६० या हेल्पलाईनवर कॉल करून तक्रार नोंदविली. काही दिवसांतच त्यांच्या खात्यात पैसे परत आले.
मध्य प्रदेशातही एका महिलेची फसवणूक झाली होती. एका युरोपीयन व्यक्तीने महिलेशी ऑनलाईन मैत्री केली. या महिलेला कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून ५९,५०७ रुपयांची फसवणूक केली. या महिलेने तक्रार केल्यावर एअरटेल पेमेंट बॅँकेच्या माध्यमातून सर्व पैसे परत मिळाले.
त्याचबरोबर राजस्थानच्या एका व्यक्तीला लकी ड्रॉ मोबाईल क्रमांकाच्या आमिषाने ४७ हजार रुपयांना फसविण्यात आले. त्यांचेही पूर्ण पैसे परत मिळाले आहेत.या हेल्पलाईनची कार्यपध्दती सांगताना गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले की एखाद्याने फसवणुकीची तक्रार केल्यावर तातडीने तक्रारकर्त्याच्य क्रमांकासह ज्या बॅँकेकडे किंवा वॉलेटमध्ये पैसे गेले आहेत त्यांना कळविले जाते.
त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जातात. बॅँकेच्या यंत्रणेत ही माहिती गेल्यावर सतत फ्लॅश होत राहते. जोपर्यंत ही रक्कम फ्रिज होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.फसवणूक झाल्यावर २४ तासांच्या आत तक्रार करायची आहे.
त्यानंतर तक्रारकर्त्याला तातडीने एसएमएसद्वारे तक्रारीची पोहोच आणि एक क्रमांक दिला जातो. त्याचबरोबर २४ तासांच्या आत राष्टीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर ही माहिती दिली जाते. त्यामुळे देशातून कोठूनही फसवणूक झाली असल्यात तपास करणे सोपे जाते.केंद्रीय गृह मंत्रालयाची ही हेल्पलाईन असली तरी त्याचे संचलन स्थानिक पोलीसच करतात. त्यामुळे स्थानिक भाषेतही तक्रार करणे शक्य होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App