UP ZP Elections : उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला झेंडा फडकावला आहे. यापूर्वीच भाजपचे 21 उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते आणि शनिवारी 53 जागांवर मतदानानंतर भाजपने विरोधी पक्षांनाही धूळ चारली आहे. UP ZP Elections BJP Won 65 out of 75 seats, Big Blow For Samajvadi Party and Congress
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला झेंडा फडकावला आहे. यापूर्वीच भाजपचे 21 उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते आणि शनिवारी 53 जागांवर मतदानानंतर भाजपने विरोधी पक्षांनाही धूळ चारली आहे.
जिल्हा पंचायत अध्यक्षपदी 75 पैकी 65 जागा भाजपने जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या खात्यात सहा जागा आहेत, तर इतरांनी चार जागा जिंकल्या आहेत. भाजपने समाजवादी पक्षाला त्यांचे बालेकिल्ले मैनपुरी, रामपूर, बदायूं आणि आझमगडमध्ये तसेच कॉंग्रेसला रायबरेलीत पराभूत केले आहे. काँग्रेसचा या निवडणुकीत मोठा पराभव झाल्याने पक्षाने जनाधार गमावल्याचे दिसते. तर सपाचे महत्त्वाचे बालेकिल्ले हातातून गेल्याने अखिलेश यादव यांच्यासाठी हा मोठा झटका आहे.
उत्तर प्रदेशच्या सत्तेचे सेमीफायनल मानल्या जाणार्या जिल्हा पंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला अपक्ष उमेदवारांचे भरपूर पाठबळ मिळाले आहे. यासह भाजपशी युती करणाऱ्या अपना दल (एस) नेही दोन पैकी एक जागा जिंकली आहे. बसपचे माजी खासदार धनंजय सिंह यांच्या पत्नी श्रीकला सिंह जौनपुरमध्ये जिंकल्या आहेत. यासह समाजवादी पक्षाने प्रतापगडमध्ये बलिया आणि आझमगड, रघुराज प्रतापसिंग ऊर्फ राजा भैया यांचे वर्चस्व कायम ठेवले आहे. जेव्हा त्यांचा पक्ष जनसत्ता दलाने खाते उघडले, तर बागपतमध्ये आरएलडीला विजय नोंदविण्यात यश आले.
उत्तर प्रदेश में जिला पंचायत अध्यक्ष पद के चुनाव में भाजपा की ऐतिहासिक विजय आदरणीय प्रधानमंत्री जी की लोक कल्याणकारी नीतियों का प्रतिफल है। यह उत्तर प्रदेश में स्थापित सुशासन के प्रति जन विश्वास का प्रकटीकरण है। सभी प्रदेशवासियों का धन्यवाद एवं विजय की हार्दिक बधाई! — Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) July 3, 2021
उत्तर प्रदेश में जिला पंचायत अध्यक्ष पद के चुनाव में भाजपा की ऐतिहासिक विजय आदरणीय प्रधानमंत्री जी की लोक कल्याणकारी नीतियों का प्रतिफल है।
यह उत्तर प्रदेश में स्थापित सुशासन के प्रति जन विश्वास का प्रकटीकरण है।
सभी प्रदेशवासियों का धन्यवाद एवं विजय की हार्दिक बधाई!
— Yogi Adityanath (मोदी का परिवार) (@myogiadityanath) July 3, 2021
ज्या 22 जिल्ह्यांत अध्यक्ष बिनविरोध निवडले त्यापैकी 21 जिल्हा भाजपचे जिल्हा पंचायत अध्यक्ष आहेत. इटावामधील आपला गड वाचविण्यात समाजवादी पक्षाला यश आले आहे. 29 जून रोजी अर्ज माघारीचा कालावधी संपताच सर्वांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. निवडून आलेल्या बिनविरोध अध्यक्षांपैकी 21 भाजपचे असून, केवळ इटावातील जिल्हा पंचायत अध्यक्षपद सपाच्या हाती लागले आहे.
अमेठी में पहली बार ज़िला पंचायत चुनाव में मिली इस ऐतिहासिक विजयश्री के लिए भाजपा प्रत्याशी एवं सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई। अभूतपूर्व जनसमर्थन के माध्यम से इस भव्य जीत को साकार करने एवं भाजपा पर अपना विश्वास जताने के लिए समस्त अमेठीवासियों का हार्दिक धन्यवाद। — Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) July 3, 2021
अमेठी में पहली बार ज़िला पंचायत चुनाव में मिली इस ऐतिहासिक विजयश्री के लिए भाजपा प्रत्याशी एवं सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई।
अभूतपूर्व जनसमर्थन के माध्यम से इस भव्य जीत को साकार करने एवं भाजपा पर अपना विश्वास जताने के लिए समस्त अमेठीवासियों का हार्दिक धन्यवाद।
— Smriti Z Irani (Modi Ka Parivar) (@smritiirani) July 3, 2021
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 53 जिल्ह्यांत एकूण 116 उमेदवार रिंगणात होते. यातील 46 जिल्ह्यांत प्रत्येकी दोन उमेदवार असल्याने त्यांच्यात थेट स्पर्धा होणार होती. यापैकी बहुतेक ठिकाणी भाजप आणि समाजवादी पक्षाचे उमेदवार समोरासमोर होते. चार जागांवर तिरंगी निवडणूक झाली, तर तीन जागांवर चार उमेदवारांनी निवडणूक लढवली. आगामी विधानसभांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
मुझफ्फरनगर, शामली, बागपत, हापूर, बिजनौर, रामपूर, संभळ, बरेली, बदायूं, अलीगढ, हाथरस, एटा, कासगंज, मथुरा, फिरोजाबाद, मैनपुरी, कानपूर नगर, फर्रुखाबाद, कन्नौज, औरैया, कानपूर शहर, कानपूर ग्रामीण, जालौन, महोबा, हमीरपूर, फतेहपूर, कौशांबी, प्रयागराज, प्रतापगड, रायबरेली, उन्नाव, हरदोई, लखनऊ, सीतापूर, लखीमपुर खेरी, अमेठी, बाराबंकी, सुलतानपूर, आंबेडकर नगर, अयोध्या, बस्ती, सिद्धार्थनगर, संत कबीर नगर, महाराजगंज , कुशीनगर, देवरिया, आझमगड, बलिया, गाजीपूर, चांदौली, जौनपूर, भदोही, मिर्जापूर आणि सोनभद्र.
UP ZP Elections BJP Won 65 out of 75 seats, Big Blow For Samajvadi Party and Congress
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App