ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा

ED raids 6 places in Delhi and UP in connection with PMLA Case and religious conversion

उत्तर प्रदेशातील काही मूकबधिर विद्यार्थी आणि गरिबांच्या नुकत्याच झालेल्या धर्मांतर आणि परदेशातून पैसे मिळाल्याच्या प्रकरणात दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. ED raids 6 places in Delhi and UP in connection with PMLA Case and religious conversion


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील काही मूकबधिर विद्यार्थी आणि गरिबांच्या नुकत्याच झालेल्या धर्मांतर आणि परदेशातून पैसे मिळाल्याच्या प्रकरणात दिल्ली आणि उत्तर प्रदेशात शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सहा ठिकाणी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय तपास संस्थेने गेल्या महिन्यात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीखाली फौजदारी गुन्हा दाखल केला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने या प्रकरणाचा भंडाफोड केला असून एजन्सी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

एटीएसने दोन जणांना अटक केली, हे दोघेही दिल्लीतील जामिया नगर येथील रहिवासी आहेत. त्याचबरोबर एटीएसने असा दावा केला की, ते इस्लामिक दावा केंद्र नावाची संस्था चालवित होते. ते बेकायदेशीर कामांत गुंतल्याचा आरोप असून त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि इतर परदेशी एजन्सींकडून पैसे मिळत होते. पोलिसांनी अटक केलेले मुफ्ती काझी जहांगीर आलम कासमी आणि मोहम्मद उमर गौतम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या ठिकाणी छापे

शनिवारी दिल्ली येथील ईडी अधिकाऱ्यांनी आयडीसीचे कार्यालय तसेच मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी यांचे निवासस्थान येथे छापे टाकले. ही सर्व ठिकाणे शहरातील जामियानगरमध्ये आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये ईडीने लखनऊमधील अल हसन एज्युकेशन अँड वेलफेयर फाउंडेशन आणि गायडन्स एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटीच्या कार्यालयांवर छापा टाकला. अधिकार्‍यांनी सांगितले की, या संस्था उमर गौतम चालवत आहे आणि या कथित बेकायदेशीर धर्मांतरप्रकरणी गुंतलेल्या आहेत.

ED raids 6 places in Delhi and UP in connection with PMLA Case and religious conversion

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर