Sanjay Raut criticizes BJP : आघाडी सरकारमधील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घालावा, खोट्या तलवारींचा परिणाम होत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. Shiv Sena MP Sanjay Raut criticizes BJP Over Central Investigation Agencies interfere in State
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आघाडी सरकारमधील नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घालावा, खोट्या तलवारींचा परिणाम होत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार पाडू शकतो, असं वाटत असेल तर ते कदापि शक्य नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे, पण खोट्या तलवारीचे घाव घालू नका, असेही ते म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, सरकारबद्दल कुणालाही मार्ग बदलता येणार नाही. महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. त्याने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचं कथानक आहे. कधीही पांडवांनाच घेरलं जातं. कौरव अधर्माच्या बाजूने होते. कौरव हे असत्याचं प्रतीक आहे. सध्या सरकारलाही घेरलं गेलं आहे. श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सध्याचं सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत ते महणाले की, पवार अधूनमधून मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. ते आमचे मार्गदर्शक आहेत. देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. वडीलधारे आहेत. मधल्या काळात ते आजारी होते. त्यामुळे काल भेटले. ते भेटले की चर्चा होते. पण संशयाचे वातावरण नाही. आम्ही विरोधकांशी मुकाबला करायचं ठरवलं आहे.
Shiv Sena MP Sanjay Raut criticizes BJP Over Central Investigation Agencies interfere in State
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App