price hike from 1st july : कोरोना काळात रोजगाराचे संकट आहे आणि त्यादरम्यान आता सर्वसामान्यांनाही महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आधीच वाढ होत आहे. आता आजपासून म्हणजेच नवीन महिना सुरू होताच इतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे खर्चात चांगलीच वाढ होणार आहे. दूध असो किंवा बँकेचे सर्व्हिस चार्ज असो, जुलैमध्ये या बाबी महाग होत आहेत. amul milk LPG Cylinder price hike from 1st july, bank service new charges tds rules also changed
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना काळात रोजगाराचे संकट आहे आणि त्यादरम्यान आता सर्वसामान्यांनाही महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आधीच वाढ होत आहे. आता आजपासून म्हणजेच नवीन महिना सुरू होताच इतर बऱ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे खर्चात चांगलीच वाढ होणार आहे. दूध असो किंवा बँकेचे सर्व्हिस चार्ज असो, जुलैमध्ये या बाबी महाग होत आहेत.
आजपासून अमूल दुधाचे दर वाढत आहेत, दिल्ली, महाराष्ट्र असो वा यूपी-गुजरात १ जुलैपासून अमूलच्या दुधाचे पदार्थ महागणार आहेत. अमूलने दुधाची किंमत प्रति लिटर 2 रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अमूलने दीड वर्षानंतर आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केली आहे, याबद्दल कंपनीने बुधवारी सर्वांना माहिती दिली.
आता 1 जुलैपासून नवीन किंमत लागू झाल्यानंतर अमूल गोल्ड 58 रुपये प्रति लीटर, अमूल ताजा 46 रुपये प्रति लिटर, अमूल शक्ती 52 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होईल. अमूलनंतर इतर कंपन्यादेखील त्यांच्या दुधाच्या उत्पादनांच्या किंमती वाढवू शकतात.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने आता पैसे काढण्यासाठी शुल्क वाढविले आहे. आता ग्राहक महिन्यातून फक्त चार वेळा पैसे काढू शकतील, जर यापेक्षा अधिक रक्कम शाखेतून काढली गेली तर 15 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. केवळ शाखाच नाही तर एसबीआयच्या एटीएमवरही हाच नियम लागू असेल.
याशिवाय स्टेट बँकेने धनादेशाचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, आता कोणत्याही खातेधारकाला आर्थिक वर्षात 10 धनादेश विनामूल्य मिळतील. यापेक्षा जास्तीसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील. एसबीआयव्यतिरिक्त अॅक्सिस बँक, आयडीबीआय बँकेने त्यांचे एसएमएस शुल्क, लॉकर शुल्कही बदलले आहेत, ते 1 जुलैपासून लागू होतील.
1 जुलैपासून एक महत्त्वाचा बदल म्हणजे ज्यांनी दोन वर्षांपासून आयकर विवरणपत्र भरले नाही, आता त्यांना 1 जुलैपासून अधिक टीडीएस भरावा लागेल. ज्यांचा टीडीएस दरवर्षी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त कपात केला जातो त्यांच्यासाठी हा नवीन नियम लागू होईल.
या सर्वाशिवाय एलपीजी सिलिंडरच्या किंमतीही 1 जुलैपासून वाढल्या आहेत. 1 जुलैपासून विना अनुदानित सिलिंडरसाठी आपल्याला 25 रुपये अधिक द्यावे लागतील. देशांतर्गत सिलिंडरच्या किंमतीबद्दल जर आपण चर्चा केली तर 1 जुलै रोजी दिल्लीत आता या सिलिंडरची किंमत 834 रुपये आहे. तर कोलकातामध्ये किंमत 861 रुपयांवर गेली आहे. तर दिल्लीत आता 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 1550 वर गेली आहे, ती 76 रुपयांनी वाढली आहे.
या सर्व गोष्टींशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर दररोज सकाळी जाहीर केले जातात, गेल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 वेळा वाढविण्यात आल्या.
amul milk LPG Cylinder price hike from 1st july, bank service new charges tds rules also changed
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App