विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये १२० पैकी २७ जागा जिंकून आपली दमदार पावले `आप`ने टाकली आहेत. आता गुजरात विधानसभेची निवडणूक लढविण्याची आपने तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश सवानी यांनी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला आहे. Mahesh Sawani joined AAP
दरवर्षी दिवाळीच्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठमोठ्या वस्तू बोनस रूपात देत असल्याने महेश सवानी हे हिरे व्यापारी गेल्या काही वर्षांपासून प्रकाशझोतात आले आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत मोटार, फ्लॅट अशा मोठ्या गोष्टी भेट स्वरूपात दिल्या आहेत. याशिवाय त्यांनी ५०० हून अधिक मुलींची लग्नही करून दिली आहेत.
महेश सवानी यांनी आपमध्ये प्रवेश केल्याने सुरतमध्ये भाजपला फटका बसू शकतो असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. याबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, गुजरातमध्ये आप एका रिकाम्या भूखंडासारखा आहे. त्यावर आधुनिक राजकारणाचे इमले बांधले जाऊ शकतात आणि त्याची सुरुवात महेश सवानी यांच्या पक्षप्रवेशामुळे झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App