वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : औषधांच्या गोळ्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर करून व्यसनाधिनता वाढण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपानंतर अमेरिकेतील प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने २३ कोटी डॉलरची तडजोड रक्कम भरण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांच्या गोळ्यांचे न्यूयॉर्कमधील अनेक लोकांना व्यसन लागले होते. Jhonson and Jhonson pay 23 core dollars
‘अमलीपदार्थांचा वापर करून तयार केलेल्या औषधांमुळे न्यूयॉर्क आणि देशातील अनेक भागांमध्ये व्यसन पसरले होते. लाखो लोक व्यसनाधिन झाले होते. अद्यापही अनेक जणांना या गोळ्यांचे व्यसन आहे. ही व्यसनाधिनता पसरविण्यात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा वाटा होता. आता मात्र ते अमलीपदार्थांपासून तयार केल्या जाणाऱ्या औषधांची निर्मितीपासून दूर राहणार आहेत,’ असे सरकारी वकीलांनी सांगितले.
जॉन्सन अँड जॉन्सनवर आरोप होऊन त्यांनी तडजोड रक्कम भरण्याचा पर्याय स्वीकारला असला तरी त्यांनी व्यसनाधिनता पसरल्याची जबाबदारी घेण्यास किंवा चुकीचे काही केल्याचे मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी पैस भरल्याने या प्रकरणी दोन दिवसांनंतर सुरु होणाऱ्या सुनावणीत आरोपी म्हणून या कंपनीचे नाव वगळले जाणार आहे. या प्रकरणी अनेक जणांविरोधात आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच, न्यूयॉर्कसह संपूर्ण देशभरात संबंधित वेदनाशमन गोळ्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App