
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेण्यात आले आहे. त्यांना पक्षश्रेष्ठींनी समज दिल्याचेही सांगण्यात येत असून त्यामुळे त्यांचा स्वबळाचा नारा थंड पडला आहे.Nana Patole slamed by the Congress stalwarts, the slogan of self-reliance fell cold
महाराष्ट्रातील नियोजित दौरा अर्धवट सोडून ते नाना पटोले दिल्लीत दाखल झाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, पटोलेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. नाना पटोले यांनी पुढील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला होता.
आपण कॉँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होण्यासही तयार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी छेद दिला आहे. ते म्हणाले, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वबळावर तयारी सुरु केली आहे, मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आघाडीचा निर्णय हा पार्लमेंटरी कमिटीत घेऊ.
नाना पटोले हे संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आले आहेत. महाराष्ट्रातील सरकार धोक्यात नाही. सरकार चांगले काम करत आहे. कॉंग्रेसचे समर्थन कायम राहिल आणि सरकार पाच वर्ष टिकणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nana Patole slamed by the Congress stalwarts, the slogan of self-reliance fell cold
महत्त्वाच्या बातम्या
- ‘द वायर’ विरोधात एका महिन्यात दुसऱ्यांदा FIR, पवित्र कुराण पोलिसांनी नाल्यात फेकल्याचे खोटे वृत्त दिल्याने कारवाई
- अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीच्या चेयरमनलाच दिली जिवे मारण्याची धमकी
- नागपूरनंतर आता अनिल देशमुखांच्या मुंबई निवासस्थानीही छापेमारी, ED ची आतापर्यंत 5 ठिकाणांवर धाड
- ‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये
Array