दक्षिण आफ्रिकेतील गोसियाम सिथोल नावाच्या महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिल्याचं वृत्त आलं. मात्र, आता या प्रकरणाची सत्यता तपासणाऱ्या पथकाने हा दावा खोटा असल्याचं म्हटलंय.
वृत्तसंस्था
केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील गोसियाम सिथोल नावाच्या महिलेने एकाच वेळी 10 मुलांना जन्म दिल्याचं वृत्त आलं. मात्र, आता या प्रकरणाची सत्यता तपासणाऱ्या पथकाने हा दावा खोटा असल्याचं सांगीतल आहे . गौतेम प्रांतातील अधिकाऱ्यांनी त्या भागात कोणत्याही रुग्णालयात एकावेळी 10 मुलांना जन्म दिल्याची नोंद नसल्याचा दावा केलाय. गोसियाम सिथोल एवढ्यात गर्भवती नसल्याचंही म्हटलंय. मात्र, हे वृत्त सर्वात आधी प्रकाशित करणाऱ्या प्रिटोरिया न्यूजने स्थानिक प्रशासन आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा लपवण्यासाठी माहिती लपवत असल्याचा आरोप केलाय .Fact Check :Gosiam Sithol gave birth to 10 children claim in South Africa
दक्षिण आफ्रिकेतील या महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याच्या वृत्तानंतर जगभरात याची चर्चा झाली. मात्र, त्यानंतर बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ही 37 वर्षीय महिलेचं मानसिक आरोग्य बिघडलेलं आहे. तिच्यावर याबाबत उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासनाच्या देखरेखित तिला उपचार देण्यात येत आहेत.”
सर्वात आधी वृत्त देणारी संस्था बातमीवर ठाम, स्थानिक प्रशासनावर माहिती लपवण्याचा आरोप
News never sleeps pic.twitter.com/EDyVqzOovD — Pretoria News (@pretorianews) June 16, 2021
News never sleeps pic.twitter.com/EDyVqzOovD
— Pretoria News (@pretorianews) June 16, 2021
हे वृत्त सर्वात आधी देणारी वृत्तसंस्था प्रिटोरिया न्यूजच्या मालकीहक्क असलेली इंडिपेंडेंट ऑनलाईनने (IOL) म्हटलं, “आम्ही आमच्या वृत्तावर अजूनही ठाम आहोत. सिथोलने 10 मुलांना जन्म दिला होता. मात्र, आता स्थानिक प्रशासन त्यांचा बेजबाबदारपणा झाकण्यासाठी माहिती लपवत आहे. राजधानी प्रिटोरियाच्या स्टीव बीको यूनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये (SBAH) 7 जून रोजी अपूर्ण व्यवस्थेत सिथोलने आपल्या 10 मुलांना जन्म दिला होता.”
@pretorianews top stories pic.twitter.com/2bIur15cdv — Pretoria News (@pretorianews) June 16, 2021
@pretorianews top stories pic.twitter.com/2bIur15cdv
प्रिटोरिया सरकारने मात्र आपल्यावरील आरोपांचं खंडन केलंय. हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच हे आरोप स्टीव बीको टीचिंग हॉस्पिटल आणि गौतेम प्रांतीय सरकारची प्रतिमा खराब करण्यासाठी केले जात असल्याचा दावा स्थानिक सरकारने केलाय. तसेच प्रिटोरिया न्यूजविरोधात कायदेशीर कारवाईचाही इशारा दिलाय.
आरोपांचे खंडन
गोसियाम सिथोल नावाची महिला जोहान्सबर्गजवळील गौतेम प्रांतात एका लेबर कँप थेम्बिसामध्ये राहत होती. गर्भवती असतानाच एकदा ती आपला पती टेबोगो त्सोतेत्सी सोबत स्थानिक चर्चमध्ये गेली. येथे त्यांची भेट प्रिटोरिया न्यूजचे संपादक पीट रामपेडी यांच्याशी झाली. रामपेडी यांनी या महिलेची मुलाखत घेतली. तेव्हा या महिलेने पोटात 8 मुलं असण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर 8 जून रोजी प्रिटोरिया न्यूजने या महिलेने 10 मुलांना जन्म दिल्याचं वृत्त दिलं होतं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App