आणिबाणी अगोदरही होती कॉँग्रेसची इतकी दहशत, न्या. जगमोहन सिन्हा यांना भूमिगत होऊन लिहावा लागला होता इंदिरा गांधींविरुध्दचा निकाल, घरावर होती गुप्तचरांची पाळत

देशात २५ जून रोजी आणिबाणी लागू झाली आणि नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेण्यात आले. सगळीकडे पोलीस राज सुरू झाले. मात्र, आणिबाणीच्या अगोदरपासूनच कॉँग्रेसची इतकी दहशत होती की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जनमोहन सिन्हा यांनाही तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुध्दचा निकाल लिहिण्यासाठी भूमिगत व्हावे लागले होते. त्यांनी आठ दिवस भूमिगत राहून ऐतिहासिक निकाल दिला.Justice Jagmohan Sinha had to go underground and write the verdict against Indira Gandhi, the house was under surveillance


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात २५ जून रोजी आणिबाणी लागू झाली आणि नागरिकांचे मुलभूत हक्क हिरावून घेण्यात आले. सगळीकडे पोलीस राज सुरू झाले. मात्र, आणिबाणीच्या अगोदरपासूनच कॉँग्रेसची इतकी दहशत होती की उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जनमोहन सिन्हा यांनाही तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुध्दचा निकाल लिहिण्यासाठी भूमिगत व्हावे लागले होते. त्यांनी आठ दिवस भूमिगत राहून ऐतिहासिक निकाल दिला.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असलेल्या जगमोहन सिन्हा यांनी १२ जून १९७५ रोजी एक ऐतिहासिक निकाल दिला. त्यामुळे भारतीय लोकशाहीला वेगळे वळण मिळाले. हा निकाल होता विद्यमान पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द करून त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा. मात्र, हा निकाल देताना न्या. सिन्हा यांना प्रचंड दबावाला सामोरे जावे लागले.



इंदिरा गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक जिंकली होती. त्यांच्याविरुध्द निवडणूक हरलेले उमेदवार राजनारायण यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याच आरोप केला होता. मात्र, त्यावेळी कॉँग्रेसची इतकी दहशत होती की पंतप्रधानांना न्यायालयात येण्यास भाग पाडून पाच तासांपेक्षा जास्त वेळ त्यांची चौकशी करणे सोपे नव्हते. इंदिरा गांधी आणि त्यांच्या सरकारने यासाठी त्यांच्यावर अनेक वेळा दबाव आणला. मात्र, न्या. सिन्हा अडिग होते.

राजनारायण यांच्या बाजुने लढणारे ज्येष्ठ वकील शांति भूषण लिहितात, इंदिरा गांधी यांना न्यायालयात बोलावण्या अगोदर न्या. सिन्हा यांनी सर्वांना ताकिद दिली होती की न्यायालयाच्या परंपरेचे पालन करा. न्यायमूर्ती आल्यावरच लोक उभे राहतात. त्यामुळे कोणीही साक्षीदार न्यायालयात आल्यावर लोकांना उभे राहण्याची गरज नाही.

त्यामुळे जेव्हा इंदिरा गांधी यांनी न्यायालयात प्रवेश केला तेव्हा त्यांचे वकील एस. सी. खरे वगळता कोणीही उभे राहिले नाही. ते देखील अर्धवटच उभे राहिले. इंदिरा गांधी यांच्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात एक खुर्ची ठेवण्यात आली होती.

कॉँग्रेसकडून न्या. सिन्हा यांना आमिष दाखविण्यापासून ते दबाव आणण्यापर्यंत अनेक प्रकार केले गेले. गांधी यांचे खासगी डॉक्टर माथुर न्या. सिन्हा यांचे नातेवाईक होते. त्यांनी न्या. सिन्हा यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला की इंदिरा गांधी यांच्या बाजुने निकाल दिला तर त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशपदी नियुक्ती करण्यात येईल. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला.

इंदिरा गांधी यांच्या खटल्याचा निकाल देताना तर न्या. सिन्हा यांच्यावर प्रचंड दडपण होते. त्यामुळे त्यांना अक्षरश: भूमिगत व्हावे लागले. त्यांनी आपल्या घरच्यांना सांगून ठेवले होते की ते उज्जैनला गेले आहेत असे सांगा. २८ मे ते ७ जून या काळात ते घरातच बंद राहिले.

या काळात न्या. सिन्हा यांची हेरगिरी करण्यासाठी एक इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी तैनात करण्यात आला होता. न्या. सिन्हा काय निकाल देत आहेत हे शोधण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांनी आपल्या टायपिस्टला घरी बोलावून निकाल लिहिला. मात्र, निकाल दिल्यावरच टायपिस्ट न्या. सिन्हा यांच्या घरातून बाहेर पडला.

निकालाच्या दिवशीची आठवण ज्येष्ठ पत्रकार कै. कुलदीप नय्यर यांनी लिहिली आहे. ते म्हणतात, दुबळ्या देहाचे जजसाहेब थेट न्यायालयात आले. ते खुर्चीवर बसल्यावर पेशकाराने मोठ्या आवाजात घोषणा केली की जजसाहेब जेव्हा राजनारायण यांच्या निवडणूक याचिकेवर निकाल सांगतील तेव्हा कोणीही टाळी वाजवायची नाही. त्यांनी २५८ पानांचे निकालपत्र लिहिले होते.

मात्र, ते म्हणाले मी केवळ महत्वाचे मुद्देच सांगेल. त्यांनी सांगितले की याचिकेचा स्वीकार करण्यात येणत आहे आणि न्यायालयात एकच सन्नाटा पसरला आणि दुसऱ्याच क्षणी न्यायालयात हर्षोल्हासाची लाट पसरली. पत्रकार टेलीफोन करण्यासाठी पळाले तर गुप्तचर विभागाचे लोक आपल्या कार्यालयांकडे पळत सुटले. न्या. सिन्हा यांनी इंदिरा गांधी यांना निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल दोषी मानले होते.

त्याचबरेबर यशपाल कपूर यांना त्यांनी निवडणूक प्रतिनिधी बनविले तेव्हा ते सरकारी अधिकारी होते हे देखील सांगितले. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या शामियानाच्या आणि लाऊड स्पिकरचा खर्च सरकारी पैशांनी केल्याचेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांचे पुस्तक ‘द केस दॅट शुक इंडिया’ मध्ये म्हटले आहे की तत्कालिन उपराष्टÑपती मोह्ममद हिदायतुल्ला यांनी न्या. सिन्हा यांची तुलना अमेरिकेच्या वॉटरगेट प्रकरणाची सुनावणी करणाºया जस्टीस जॉन सिरिका यांच्याशी केली होती. त्यांच्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता.

शांति भूषण यांनी लिहिले आहे की जनता पार्टीच्या सरकारमध्ये कायदा मंत्री झाल्यावर आपण त्यांची बदली हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयात करण्याची तयारी दर्शविली होते. त्यामुळे ते तेथे मुख्य न्यायाधिश बनले असते. परंतु, न्या. सिन्हा यांनी त्याला नम्रतापूर्वक नकार दिला.

न्या. सिन्हा यांच्या मुलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, इंदिरा गांधी यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्याचा निकाल दिल्यावर न्या. सिन्हा नेहमीप्रमाणेच घरी आले. ते सामान्य जीवन जगणारे होते. त्यांना वाचन आणि बागकामाची आवड होती.

इंदिरा गांधी यांच्याविरुध्द निकाल दिल्यावरही काही काळ ते अलाहाबाद न्यायालयात न्यायाधिश राहिले. निवृत्तीनंतर अलाहाबाद येथेच स्थायिक झाले. दीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. मात्र, न्या. सिन्हा यांचे सहकारी त्यांची इमानदारी, कर्तव्यनिष्ठ आणि साधेपणाची नेहमीच तारीफ करत.

Justice Jagmohan Sinha had to go underground and write the verdict against Indira Gandhi, the house was under surveillance

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात