चीनी व्हायरविरोधात लढ्यासाठी केंद्राकडून १५ हजार कोटी

चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी देशातील वैद्यकीय सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून १५ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. निदान आणि उपचाराच्या सुविधांद्वारे देशात कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी देशातील वैद्यकीय सुविधा मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून १५ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. निदान आणि उपचाराच्या सुविधांद्वारे देशात कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे.

पंतप्रधानांनी 24 मार्चला राष्ट्राला संबोधित करताना सांगितले होते की, केंद्र सरकारने कोरोना विषाणू बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि देशातील वैद्यकीय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे कोरोना चाचणी सुविधा, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई), अलगीकरण खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा , व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणांची संख्या जलद गतीने वाढवणे शक्य होईल. त्याच बरोबर वैद्यकीय आणि निमवैद्यकीय मनुष्यबळाचे प्रशिक्षण देखील हाती घेतले जाईल. त्याचाच भाग म्हणून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बाधित रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची खरेदी, भविष्यात रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि तत्परतेने मदत करण्यासाठी मजबूत राष्ट्रीय आणि राज्य आरोग्य प्रणाली निर्माण करणे , प्रयोगशाळा आणि देखरेख व्यवस्था स्थापन करणे यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आतापर्यंत, 157 सरकारी आणि 66 खासगी प्रयोगशाळांसह एकूण 223 प्रयोगशाळांमध्ये विस्तृत चाचणी प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यापूर्वीच आपत्कालीन कोविड प्रतिसादासाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 4 हजार 113 कोटी रुपये वितरित केले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात