OBC Reservation Issue : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ती सकारात्मक होती, असेही ते म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही. निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ती सकारात्मक होती, असेही ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भाजपने ओबीसी आरक्षणावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपच्या आंदोलनाआधीच निवडणुका न होऊ देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपचे वरातीमागून घोडे आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ नये या मुद्दयावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांशी यावरून चर्चा झाली असून ती सकारात्मक असल्याचा दावाही त्यांनी केला.
ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी येत्या 26 आणि 27 जून रोजी लोणावळ्यात चिंतन बैठक होणार असल्याच ते म्हणाले. आम्ही इम्पिरिकल डेटाबाबत केंद्राकडे मागणी केली. केंद्राकडून हा डेटा मिळावा ही अपेक्षा आहे. तसेच डेटा गोळा करण्याचं काम आयोगाला देण्यात आलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Vijay Wadettiwar Says We will not Allow Elections Until OBC Reservation Issue Solves
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App