दिल्लीतील रेस्टॉरन्ट बंद पडल्याने व्यथित झालेले बाबा का ढाबाचे मालक कांताप्रसाद यांनी झोपेच्य गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी सोशल मीडियामुळे कांताप्रसाद प्रसिध्द झाले होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतही मिळाली होती. त्यातून त्यांनी दिल्लीमध्ये हॉटेल सुरू केले मात्र ते बंद पडले. Baba Ka Dhaba owner Kanta Prasad’s suicide attempt came to prominence due to social media
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीतील रेस्टॉरन्ट बंद पडल्याने व्यथित झालेले बाबा का ढाबाचे मालक कांताप्रसाद यांनी झोपेच्य गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी सोशल मीडियामुळे कांताप्रसाद प्रसिध्द झाले होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर मदतही मिळाली होती. त्यातून त्यांनी दिल्लीमध्ये हॉटेल सुरू केले मात्र ते बंद पडले.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास ८१ वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्यप्राशन केले होते. त्याचबरोबर झोपेच्या गोळ्याही घेतल्या होत्या.
सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील बाबा का ढाबा ा चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडं मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांची व्यथा युट्यूबवर गौरव वासन याने व्हिडीओच्या माध्यमातून मांडली होती. यानंतर त्यांना मदत करण्यासाठी लोकांनी त्याच्या ढाब्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती.
मदतीमध्ये मिळालेल्या पैशामुळे कांता प्रसाद यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होते. मात्र त्यानंतर युट्यूबवर गौरव वासन याच्यावरच मिळालेली मदत चोरल्याचा आरोप झाला. त्याच्याविरोधात देणगीमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गौरव वासनने हे आरोप फेटाळून लावत आपले बँक स्टेटमेंट जाहीर केले होते.
पण डिसेंबर महिन्यात कांता प्रसाद यांनीसुरु केलेलं रेस्टॉरंट बंद पडलं. यामुळे कांता प्रसाद यांना पुन्हा आपल्या जुन्या ढाब्यावर परतावं लागलं. यावेळी त्यांनी गौरव वासनची माफीदेखील मागितली. गौरव वासननेही त्यांची भेट घेत आपल्या मनात काही शैल्य नसल्याचं म्हणत प्रकरण मिटवलं होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App