वृत्तसंस्था
मुंबई : ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी सोहळ्याला 24 जूनच्या आत किमान 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारीला परवानगी द्या, अशी मागणी विदर्भातील वारकऱ्यांनी केली. अन्यथा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आळंदीकडे कूच करणार आहे,असा इशारा त्यांनी दिला आहे. let’s go Alandi ! Warning of Warakaris; Warkari will march with a Corona negative report
यंदाच्या आषाढी वारीसाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. सर्व नियमांचे पालन करु मात्र, पायी वारीची परवानगी द्या,असे आवाहन वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच संदर्भात विश्व वारकरी सेनेने राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
आषाढी वारी पायी नेण्यासाठी तत्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी विदर्भातील वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. किमान ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला सर्व अटी घालून परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. ही परवानगी न दिल्यास आम्ही सरकारला सांगतो ‘माझी वारी माझी जबाबदारी’ याने नियमाने कोरोना निगेटिव्हचे रिपोर्ट सोबत घेऊन आम्ही आळंदीला पायी जाणार आहोत. आमच्या सोबत इतर वारकरी संघटना सुद्धा येणार आहेतच.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App