Pakistan Mango diplomacy : कोरोना साथीचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानने नवीन मुत्सद्दी धोरण स्वीकारले आहे, परंतु त्यांचे खास मित्र चीन आणि अमेरिकेने त्यांच्या अपेक्षांवर विरजण टाकले आहे. नव्या मुत्सद्देगिरीनुसार पाकिस्तान जगभरातील देशांना भेट म्हणून विविध प्रकारचे आंबे पाठवत आहे. तथापि, पाकिस्तानची ही ‘मँगो डिप्लोमसी’ त्याचे जिवलग मित्र चीन आणि अमेरिकेला मात्र पसंत पडली नाही. त्यांनी पाकिस्तानकडून भेट म्हणून पाठविलेले आंबे परत केले आहेत. US, China decline Pakistan Mango diplomacy, sends back fruit souvenirs
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोना साथीचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानने नवीन मुत्सद्दी धोरण स्वीकारले आहे, परंतु त्यांचे खास मित्र चीन आणि अमेरिकेने त्यांच्या अपेक्षांवर विरजण टाकले आहे. नव्या मुत्सद्देगिरीनुसार पाकिस्तान जगभरातील देशांना भेट म्हणून विविध प्रकारचे आंबे पाठवत आहे. तथापि, पाकिस्तानची ही ‘मँगो डिप्लोमसी’ त्याचे जिवलग मित्र चीन आणि अमेरिकेला मात्र पसंत पडली नाही. त्यांनी पाकिस्तानकडून भेट म्हणून पाठविलेले आंबे परत केले आहेत.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एफओ) बुधवारी अमेरिका आणि चीनसह 32 हून अधिक देशांच्या प्रमुखांना भेट म्हणून आंबे पाठवले, परंतु अमेरिका आणि चीनसारख्या देशांनी आपल्या कोरोनाच्या क्वारंटाइन नियमांचा हवाला देत या भेटी नाकारल्या.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांनी ‘चौंसा’ वाणाचे आंबे 32 देशांच्या राष्ट्राध्यक्ष व सरकारच्या प्रमुखांना पाठवले होते. इराण, आखाती देश, तुर्की, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि रशिया येथे आंब्यांचे बॉक्स पाठविण्यात आले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या या यादीमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही नाव होते, परंतु पॅरिसच्या पाकिस्तानच्या भेटीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.
चीन आणि अमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा, नेपाळ, इजिप्त आणि श्रीलंका यांनीही पाकिस्तानकडून भेट म्हणून पाठविलेला आंबा स्वीकारण्यास नकार दिला. यामागे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांचा हवाला दिला. पाकिस्तानद्वारे पाठवण्यात येणाऱ्या आंब्याच्या वाणांमध्ये यापूर्वी ‘अन्वर रत्तोल’ आणि ‘सिंधारी’चाही समावेश होता, परंतु यावेळी दोन्ही यातून वगळण्यात आले.
US, China decline Pakistan Mango diplomacy, sends back fruit souvenirs
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App