विशेष प्रतिनिधी
मुंबई – महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण अशा तीन कंपन्यांमधील तब्बल १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी सुमारे ४५० कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे.450 MSEB workers died due to corona
कोरोना काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन्ही कंपन्यांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. तिन्ही कंपन्यांमधील १३ हजार ३५० कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वीज कर्मचाऱ्यांनाही ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सात दिवस काम बंद आंदोलन केले.
ऊर्जा विभागाच्या आश्वासनांनुसार संघटनांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने मदत जाहीर करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App